Madhuri Dixit and Dr Shriram Nene love story : माधुरीने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा ती करिअरच्या शिखरावर होती. तिच्याकडे खूप प्रोजेक्ट होते. लग्नानंतर दहा दिवसांचा हनिमून हवाई बेटांवर साजरा करून मग ती भारतात परतली.

माधुरी दीक्षितच्या भावाच्या घरी, अमेरिकेत झालेल्या एका हाऊस पार्टीमध्ये माधुरी आणि श्रीराम पहिल्यांदा भेटले आणि माधुरीच्या काळजाने उडी घेतली. श्रीरामच्या प्रेमात माधुरी इतकी वेडी झाली होती की पुन्हा पुन्हा भेटत राहून, पार्टी, बाईक राईड्पासून सुरू झालेली ही कहाणी लग्नाच्या वेदीपर्यंत कशी आली ते पाहूया. श्रीरामच्या प्रेमासाठी, स्वत:च्या वैवाहिक आयुष्यासाठी माधुरीने स्वत:चं चांगलं चाललेलं करिअर सोडून थेट अमेरिकेत जाऊन संसार थाटला.

वयाच्या फक्त सतराव्या वर्षी राजश्री प्रॉडक्शन्सच्या ’अबोध’ या सिनेमातून माधुरीचं बॉलिवूड पदार्पण झालं. छोट्याश्या माधुरीने सुंदर अभिनय करून समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या सिनेमानंतर माधुरीने राहिलेल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आणि काही वर्षांनी पुनरागमन केलं तेव्हा बॉलीवूडमध्ये नवी लेडी स्टार उगवली होती. त्याकाळातल्या सगळ्या मुख्य अभिनेत्यांसोबत माधुरीने काम केलं आहे. आजही माधुरीचं फॅन फॉलोईंग अफाट आहे.

पण माधुरी ज्याची बघताक्षणीच फॅन झाली तो होता श्रीराम नेने. अमेरिकेत हार्ट सर्जन म्हणून करिअर करत असलेला डॉ. श्रीराम नेने. एका मुलाखतीमध्ये माधुरीने सांगितलं होतं की तिची आणि श्रीरामची भेट अगदी योगायोगाने तिच्या भावाच्या घरी लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीरामला माधुरी भारतातली फिल्म सुपरस्टार असल्याची अजिबात कल्पना नव्हती. ही गोष्ट माधुरीला विशेष आवडली.

पहिल्या भेटीनंतर त्यांच्या छान मैत्री झाली. त्यानंतर श्रीरामने तिला बाईक राईडला येणार का म्हणून विचारलं होतं. तेव्हा माधुरीला डोंगरावर बाईक राईडसाठी जायचंय असंच सोपं सहज वाटलं होतं. मात्र तो रस्ता खूप खाचखळग्यांचा आणि अनंत अडचणींनी भरलेला होता. इथेच माधुरी आणि श्रीराम एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट करून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

माधुरीने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा ती करिअरच्या शिखरावर होती. तिच्याकडे खूप प्रोजेक्ट होते. लग्नानंतर दहा दिवसांचा हनिमून हवाई बेटांवर साजरा करून मग ती भारतात परतली. माधुरीने कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा धडाका लावला. सगळे सिनेमे पूर्ण करून माधुरी तिचा पती श्रीरामसोबत अमेरिकेत निघून गेली. बॉलीवूडचा असा निरोप घेतल्यामुळे माधुरीच्या चाहत्यांना मोठाच धक्का बसला होता. जवळपास बारा वर्षं अमेरिकेत वास्तव्य करून माधुरी तिच्या कुटुंबासह भारतात परतली. आल्याबरोबर तिने सिनेमातही पुन्हा प्रवेश केला. याकाळात माधुरीने केलेले सिनेमे फारसे चालले नाहीत. पण माधुरी तिच्या नृत्य कौशल्यामुळे वेगवेगळ्य़ा रिऍलिटी शोची परीक्षक असते. तिच्या चाहत्यांमध्ये ती अजूनही तितकीच प्रसिद्ध आहे. श्रीराम-माधुरी नेने या जोडप्याला दोन मुलगे आहेत. हार्ट सर्जन असलेला श्रीराम मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये सर्जन मह्णून सेवा देतो.