sonakshi sinha weight loss : सोनाक्षी सिन्हा हे बॉलीवूडमधील एक नावाजलेले नाव आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि दबंग गर्ल एक बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखली जाते.

सोनाक्षी सिन्हा हे बॉलीवूडमधील एक नावाजलेले नाव आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि दबंग गर्ल एक बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखली जाते. सिनेसृष्टीतील आपल्या करिअरची सुरूवात तिने सलमान खानच्या दबंगमधून केली. ‘थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है’ या तिच्या एका डायलॉगमुळे ती प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली होती. सन ऑफ सरदार, दबंग २, दबंग ३, रावडी राठोड, लुटेरा, खानदानी शफाखाना अशा बऱ्याच सिनेमांमधून उत्कृष्ट अभिनय करून तिने आपल्या अभिनय कौशल्याची दखल घेण्यास समीक्षकांना आणि प्रेक्षकांना भाग पाडले. तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात पाहायला गेलं तर चांगलीच झाली. पण सोनाक्षी सतत आपल्या वजनामुळे ट्रोल होत राहिली. पिक्चर मिळत असताना ती बऱ्याच वेळा बॉलीवूडमधील दिग्गजांकडून तसेच प्रेक्षकांकडून ट्रोल केली जायची. याचे कारण होते तिचे वजन.

एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने आपल्या वजनाबद्दल एक गोष्ट सांगितली होती. कॉलेजमध्ये फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी ती उत्सुक होती. पण तिच्या मैत्रिणीने तिचे वजन जास्त असल्या कारणाने तिला लाइट्स पकडण्याचे काम दिले होते. त्यामुळे फॅशन शोमध्ये भाग घेण्याचे तिचे स्वप्न अपुरेच राहिले होते. पण तिने खचून न जाता, हार न मानता आपले ९५ किलो वजन आटोक्यात आणण्याचे सतत प्रयत्न करत राहिली. ती स्वतः फॅशन डिझाइनर देखील आहे.

पुढे तिला सलमान खानच्या दंबग सिनेमामधून सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण ही संधी मिळणे ही देखील इतकी सोपी गोष्ट नव्हती बरं का… सलमान खानने तिला एक अट घातली होती की तुझे वजन कमी झाले पाहिजे आणि त्यासाठी सोनाक्षी सिन्हाने हॉटेल पासून शूटिंग लोकेशनपर्यंत रोज पायी आलं पाहिजे. ना कोणती गाडी न्यायला येईल ना कोणती बस. रोज पायी आलंच पाहिजे असा त्याने नियम घालून दिला होता.

अशी ही अकिरा अँक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेचा विषय असते. २०१२ मध्ये सोनाक्षी सिन्हा सलमान खानचा नातेवाईक बंटी सचदेवा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तसेच शाहिद कपूर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांच्यासोबत देखील तिचे नाव जोडण्यात आले होते.