या कारणामुळे ‘खुदा गवाह’ चित्रपटात एकत्र दिसू शकले नव्हते अमिताभ बच्चन आणि संजय दत्त / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

‘सर जमीने हिंदुस्तान…’ हा 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खुदा गवाह’ चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजातील संवाद आजही लोकांच्या लक्षात आहे. पण तुम्हाला माहितेय का, कदाचित प्रेक्षकांना हा संवाद अमिताभ यांच्याऐवजी अभिनेता संजय दत्त याच्या आवाजात ऐकायला मिळाला असता, जर संजय दत्त याने दिग्दर्शक मुकुल आनंद यांची विनंती मान्य करून हा चित्रपट केला असता तर. कारण या चित्रपटासाठी मुकुल आनंद यांनी सर्वांत प्रथम संजय दत्तलाच विचारले होते. तर, अमिताभ बच्चन या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार होते आणि याच कारणामुळे संजय दत्तने मुकुल आनंद यांनी वारंवार विनंती करूनही चित्रपट स्वीकारला नव्हता.

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. एकदा तरी आपल्याला अमिताभ यांच्यासोबत काम करायला मिळेल, अशी आशा प्रत्येक जण बाळगून असतो. असे असले तरी संजय दत्त याने केवळ अमिताभही फिल्ममध्ये आहेत म्हणून ‘खुदा गवाह’ फिल्म करण्यास नकार दिला होता. या चित्रपटात लीड रोलसाठी दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी सर्वांत प्रथम संजय दत्तलाच विचारले होते आणि अमिताभ बच्चन यांची भूमिका खूपच छोटी होती, पाहुणे कलाकार म्हणून ते दिसणार होते. पण तरीही अमिताभ यांनी चित्रपटात काम केल्यानंतर आपल्या भूमिकेला महत्त्व मिळणार नाही, असे वाटून संजय दत्तने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

मुकुल आनंद यांनी संजय दत्तला विनवण्याचा प्रयत्न केला पण, त्याने चित्रपट साइन केलाच नाही. त्यानंतर आनंद यांनी दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी याला लीड रोलसाठी विचारले होते, पण काही कारणांमुळे नंतर अमिताभ बच्चनच मुख्य भूमिकेत दिसले. त्यानुसार मग कहाणीत आणि कलाकारांच्या भूमिकांमध्ये थोडा बदल करण्यात आला. त्यानंतर 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काटे’ चित्रपटात संजय दत्त आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसले होते. या चित्रपटात काम करण्यासाठी स्वतः संजय दत्तने अमिताभ यांना तयार केले होते. त्यानंतर दोघांनी ‘एक अजनबी’, ‘दीवार’, ‘शूटआउट एट लोखंडवाला’ अशा काही चित्रपटांतून एकत्र काम केले. असे असले तरी आपण ‘खुदा गवाह’ फिल्म नाकारण्याचा आपला निर्णय योग्य होता, असा खुलासा संजय दत्तने एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी केला होता.

why sanjay dutt refused to work with amitabh bachchan