गोविंदाच्या बॉलिवूडमधील पुनरागमनास सलमानच जबाबदार होता. या दोघांनी पार्टनर या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला.

एकेकाळी बॉलीवूडचा बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध असणारा सलमान खान आता बीइंग ह्युमन नावाच्या फाऊंडेशनद्वारे बरीच सामाजिक कामे करत असतो. इतका रफ टफ, डॅशिंग, स्टायलिश सलमान खानही कोणाला घाबरतो ह्या गोष्टीवर कुणाचा बरे विश्वास बसेल? पण मित्रांनो सलमान खानला देखील एकेकाळी बॉलीवूडमधल्या सुपरडुपर हिट असलेल्या सुपरस्टार गोविंदासोबत काम करण्याची भीती वाटायची.

त्याचं झालं असं होतं की, जेव्हा सलमान खानने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यावेळी गोविंदा हे बॉलीवूडमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. एकदा त्या दोघांची भेट फिल्मसिटी मधील बाथरुममध्ये झाली होती. तेव्हा अजून एकही मूव्हीमध्ये काम न केलेल्या सलमान खानने फुल ऍटिट्यूडमध्ये गोविंदाला हॅलो केलं होतं. ह्याचा अजिबात राग न धरता, गोविंदाने अतिशय प्रेमळपणे सलमान खानला आपला शूटिंगचा लूक चांगला दिसतोय का असे विचारले होते. त्यावेळी सलमान खानला गोविंदाच्या डाऊन टू अर्थ स्वभावाची जाणीव झाली होती. आणि स्वतःच्या हॅलोमधील ऍटिट्यूड आठवून खूप वाईट वाटले होते. सलमान खानने स्वतः ही घटना एका मुलाखतीत सांगितली होती.

गोविंदाच्या बॉलिवूडमधील पुनरागमनास सलमानच जबाबदार होता. गोविंदाने एका मुलाखतीत असे सांगितले होते की जेव्हा दोन सुपरस्टार एका सिनेमामध्ये काम करतात. तेव्हा नेमका कोणत्या कलाकाराला जास्त प्रेफरन्स द्यायचा यावरून मतभेद होण्याची शक्यता असायची. त्यामुळेच त्यांनी आजवर सलमान खानसोबत काम केले नव्हते. त्यानंतर बरीच वर्षे दोघांनी एकमेकांसोबत काम केले नव्हते.

पण शेवटी तो योग जुळून आला. या दोघांनी पार्टनर या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. या सिनेमामध्ये त्यांच्यासोबत कॅटरिना कैफ देखील दिसली होती.