रोमँटिक आणि दोन भन्नाट लव्हस्टोरींवर आधारित असलेला 'मन फकीरा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.

रोमँटिक आणि दोन भन्नाट लव्हस्टोरींवर आधारित असलेला ‘मन फकीरा’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने अनेकांना त्यांच्या लग्नापूर्वीच्या प्रेमाची नक्कीच आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच हा सिनेमा अनेकांच्या मनाला भावतो.

मन फकीरा ही गोष्ट आहे दोन तरुण आणि तरुणींची. त्यांची लग्नापूर्वीच्या एका प्रेमाची गोष्ट या सिनेमातून उत्तम पद्धतीने मांडली आहे. या सिनेमामध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे प्रमुख भूमिकेत आहेत. चौघांनी देखील या सिनेमात भन्नाट काम केलं असून, प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

सुव्रतने भूषण, सायलीने रिया, अंजलीने माही आणि अनिकेतने नचिकेत ही पात्रे साकारली आहेत. आजच्या पिढीतील असणारी ही चारही पात्रे स्वतंत्र विचारांची आहेत. आपले विचार बिनधास्तपणे ते व्यक्त करतात. या सिनेमात भूषण आणि रिया यांचे लग्न झालेलं असतं.

लग्नापूर्वी भूषणची गर्लफ्रेंड असते तर रियाचा बॉयफ्रेंड असतो. पण घरच्यांच्या सांगण्यावरुन म्हणजेच त्यांनी अरेंज मॅरेज केलेलं असतं. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री गडबड होते. प्रणय करत असताना भूषण माहिचे नाव घेतो आणि गडबड होते. माही म्हणजे भूषणचे लग्नापूर्वीचे प्रेम अर्थात गर्लफ्रेंड. मग काय रिया सुद्धा भूषणला तिच्या एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच नचिकेतबद्दल सांगते.

दोघांचा देखील भूतकाळ एकमेकांसमोर येताच भूतकाळातील प्रेमाला पुन्हा एकदा उधाण येतं. त्यामुळे दोघांच्याही लक्षात येते की आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न न झाल्यामुळे आपण एकमेकांशी लग्न केले. या सिनेमाच्या माध्यमातूनच या चौघांच्या नात्यांमध्ये असणारा गुंता आणि तो सोडवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड ही उत्तमपणे दाखवली आहे. रिया आणि भूषण हनीमूनसाठी लंडनला जातात. त्याठिकाणी ते ठरवून माही आणि नचिकेतला भेटतात. यावेळी खरे प्रेम मिळवण्यासाठी ते यशस्वी होतात की नाही?, त्यांच्या वैवाहिक जीवनातील चढ-उतार, चौघे ही सामाजिक बंधन ओलांडून कोणते धाडसी पाऊल उचललात? त्यांच्या नात्यात असलेला गुंता सुटतो की नाही? त्यांचे प्रेम टिकते की नाही या सगळ्यांची उत्तरं हा सिनेमा पाहिल्यानंतरच सगळ्यांना मिळतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *