Ram Singh Charlie Review: हास्य कलाकाराच्या वाट्याला आलेलं दुःखद जगणं

Ram Singh Charlie review in Marathi : राम सिंह चार्ली आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतो. ज्या कलाकारांना काही कारणामुळे आपली कला सोडावी लागली आहे, ज्यांचे रोजगार गेले आहेत त्यांचं आयुष्य कसं चालतं. एका कौशल्यात तुम्ही तरबेज आहात पण ते सादर करता न आल्यामुळे त्या व्यक्तीची कशी घुसमट होत असेल असा विचार आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही.