जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता लागली होती.

(Serious men review) आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं असावं, असं पालकांना का वाटतं? prospecto securo ivermectina 6 mg त्यांना मुलांची खरंच काळजी असते म्हणून की स्वतःच्या ज्या आकांक्षा अपूर्ण आहेत त्या ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात म्हणून. याचं थेट उत्तर देणं कठीण आहे. पण या प्रश्नाचा पाठलाग सुधीर मिश्राच्या सिरिअस मेन या चित्रपटात करण्यात आला आहे.

प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार मनू जोसेफ यांच्या ‘सिरिअस मेन’ नावाच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.

जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. नवाजुद्दीन सिद्दिकीची अॅक्टिंग आणि संवादफेक ऐकल्यावरच असं वाटत होतं की हा चित्रपट मैलाचा दगड ठरणार आहे. आणि चित्रपटाने ती अपेक्षा पूर्ण केली.

सिरिअस मेन‘ ही कथा आहे अय्यन मनी (नवाजुद्दीन) नावाच्या एका महत्त्वाकांक्षी, धूर्त मध्यमवर्गीय पित्याची. जो राहतो मुंबईच्या बीडीडी चाळीत आणि एका मोठ्या वैज्ञानिक संस्थेच्या संचालकाचा पर्सनल असिस्टंट आहे. दोन परस्पर भिन्न विश्वांना जोडणारा तो दुवा आहे. stromectol no prescription

त्याचं स्वतःच एक तत्त्वज्ञान आहे. तो म्हणतो की आयुष्य जर आरामशीर काढायचं असेल तर तीन पिढ्या कष्ट घ्यावं लागतं तेव्हा चौथ्या पिढीला आराम मिळतो.

त्याचं म्हणणं आहे की तो दुसऱ्या पिढीतला आहे. त्याचे वडील पहिल्या पिढीतले होते. ते अडाणी होते. याने जेमतेम शिक्षण मिळवलं आणि नोकरी मिळवली. आपला मुलगा असेल त्याला उच्च शिक्षण आणि लठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, म्हणजे आपल्या नातवाला ऐशोरामात जीवन जगता येईल असं त्याला वाटत असतं.

आपल्या मुलाने आपल्या संचालकासारखं व्हावं असं त्याला वाटत असतं असं आयुष्य पाहिजे असेल तर उत्तम शिक्षण घेण्याशिवाय काहीही पर्याय नाही याची जाणीव त्याला ठायीठायी असते. त्यासाठीच तो आपल्या मुलाला सर्वोत्तम शाळेत घालण्यासाठी जंग जंग पछाडतो.

त्याचा ९ वर्षांचा मुलगा देखील प्रचंड हुशार आहे. आपण मीडियामध्ये गेल्या काही वर्षांत अशी छोटी मुली पाहिली आहेत जे कोणतंही गणित फटाफट सोडवतात सगळे देश आणि राजधान्या त्यांना पाठ असतात त्यांचं सगळीकडे कौतुक होत असतं. तर अय्यनचा मुलगा आदी (अक्षत दास) हा अगदी तसाच आहे. ज्या वेळी त्याच्या वयाची मुलं आकडेमोड आणि पाढे पाठ करत असतात त्यावेळी तो आपल्या शिक्षकांना गणिताची अवघड कोडी घालून हैराण करत असतो.

काही दिवसांतच तो प्रसिद्ध होतो आणि त्याच्या भोवती मीडिया घोळू लागतो. त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा विचार त्या भागातला चाणाक्ष नेता केशव धावरे (संजय नॉर्वेकर) घ्यायचं ठरवतो. जसा जसा पिक्चर पुढे सरकतो तसे तसे एक-एक पदर उलगडून येताना दिसू लागतात. या पिक्चरमध्ये कुणी थेट चांगलं किंवा वाईट नाहीये तर वेळेनुसार ते निर्णय घेताना दिसतात, त्यामुळेच या सिनेमातली पात्रं ही जिवंत आणि मानवी वाटतात.

आपली व्यवस्था ही एखाद्या अन्नसाखळीसारखी आहे. जिथं सर्वांत वरती असलेला प्राणी हा त्याच्यापेक्षा खाली असलेल्या प्राण्याचं शोषण कसं करतो हे सुधीर मिश्राने दाखवलं आहे. त्यामुळेच आदी हा सर्वांसाठी एखाद्या प्रोजेक्टसारखा होऊन बसतो. त्यातून आपला फायदा कसा करायचा याचाच विचार प्रत्येक जण करताना दिसतो अशावेळी त्या लहान मुलाच्या मनावर काय परिणाम होतोय याची जाणीव कुणाला होत नाही.

या चित्रपटात अनेक विषय हाताळले गेले आहेत. जात, धर्म, वर्ग, व्यवस्था, धोकेबाजी या सर्व विषयांना या चित्रपटाने स्पर्श केला आहे. how often to give ivermectin to horses या सर्व घटकांचा उपयोग दिग्दर्शकाने त्याचा समाजाप्रती असलेला दृष्टिकोन मांडण्यासाठी उत्तमरीत्या केला आहे.

चित्रपटात सर्वांनी आपलं काम चोखरीत्या बजावलं आहे, पण सर्वांत भाव नवाजुद्दीन सिद्दिकी खाऊन जातो. दोन दृश्यांचा विशेष उल्लेख करण्यासारखा आहे. जेव्हा त्याच्या कुटुंबीयांवर संकट येईल असं त्याला कळतं ते दूर करण्यासाठी तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे त्यानं आपल्या अभिनयातून दाखवलं. तर दुसरं दृश्य आहे एका आर्ट गॅलरीमधलं. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं जे पण अय्यन करत आहे त्यापाठीमागे कारण काय आहे. ही दोन्ही दृश्यं खूप छान जमली आहेत.

‘या’ कारणासाठी केदार शिंदे आणि भरत जाधव यांचे राज ठाकरे यांनी केले कौतुक

सिनेमॅटोग्राफर अलेक्झांडर सुरकलाने चित्तवेधक दृश्यं पडद्यावर साकारली आहेत. प्रत्येक फ्रेम जिवंत, सुंदर, आणि परिणामकारक होण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे असं वाटतं.

या चित्रपटातली अनेक दृश्यं विचार करण्यासाठी भाग पाडणारी आहेत. जेव्हाही एखादं दृश्य संपून नवीन दृश्य सुरू होणार असतं त्यावेळी एखादा कामगार फ्रेममध्ये येताना दिसतो. हे लोक आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत पण त्यांच्याकडे आपलं कसं दुर्लक्ष होतं याची जाणीव या दृश्यातून होते.

चित्रपटात स्पेसचा वापर अतिशय कल्पकतेने करण्यात आला आहे. सुरुवातीची दृश्यं मुंबईतल्या चाळीची आहेत. ही अशी चाळ आहे जिथं खासगी क्षण देखील खासगी नसतात. पण चित्रपट तामिळनाडूच्या भव्य सागरी किनाऱ्यावर संपतो. जिथं तुम्हाला पाहणारं किंवा जज करणारं कुणीही नाही. दोन ठिकाणचा विरोधाभास यातून दिसून येतो.

असं असलं तरी हा चित्रपट पडद्यावर चालण्यापेक्षा आपल्या मनात चालत आहे असं वाटतं. आयुष्यातले प्रसंग, नाती कधीकधी आयुष्यच हे किती निरर्थक आणि जटील आहे याची जाणीव हा चित्रपट करून देतो. शेवटचं गाणं ‘रात काला छाता’ ही जाणीव आपल्या मनावर आणखीन ठसवून देण्यात यशस्वी होतं.

  • पंकज कुलकर्णी