ऐश्वर्या नारकर आता ५१ वयाच्या आहेत तरीही त्यांचा फॅशन सेन्स आजही प्रेक्षकांना भुरळ घालण्यास अजिबात मागे राहत नाही. नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक तुफान सुंदर फोटो त्यांनी शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. सध्या छोट्या पडद्यावरील ‘श्रीमंत घरची सून’ या मालिकेमध्ये ती दिसून येते. याआधी देखील ‘स्वामिनी’ या मालिकेमध्ये प्रथमच नकारार्थी भूमिका साकारताना ती दिसून आली होती. इतकी सुंदर आणि गोड चेहऱ्याच्या ऐश्वर्याने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये प्रथमच नकारार्थी भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांनी देखील या भूमिकेला पसंती दर्शवली होती.

लेटेस्ट फॅशनला सोबत स्वतःला कनेक्टेड ठेवणं कोणाला नाही आवडत? आपण आपले रोल मॉडेल म्हणून सेलिब्रिटींना पाहत असतो. ऐश्वर्या नारकर आता ५१ वयाच्या आहेत तरीही त्यांचा फॅशन सेन्स आजही प्रेक्षकांना भुरळ घालण्यास अजिबात मागे राहत नाही. नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक तुफान सुंदर फोटो त्यांनी शेअर केला आहे. प्रेक्षक नेहमीप्रमाणे त्यांच्या या फोटोला लाईक आणि कमेंट करुन आपल्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हातात छत्री घेतलेला, ब्लॅक अँड व्हाइट रंगातील त्यांचा हा साडीतील फोटो अत्यंत सुंदर आहे यात काही वादच नाही. या फोटोसाठी त्यांनी Petrichor हे कॅप्शन दिलेले आहे. म्हणजेच पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध, हिरव्या पानांची खदखदणारी हिरवळ, आल्हाददायक गारवा, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पावसाचीही पहिली सर सर्वांनाच आपलीशी वाटत असते. अश्याप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी हा फोटो शेअर करून पहिल्या पावसाचा आनंद  आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मध्ये ऐश्वर्या नारकर यांनी पांढऱ्या रंगातील साडी मधला एक बोल्ड अंदाजातील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. हा फोटो देखील काही क्षणांच्या कालावधीमध्येच प्रचंड व्हायरल झाला होता. अशी ही सुंदर चेहऱ्यांची आणि हुशार अभिनेत्री बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये आणि सिनेमात देखील दिसते.