अक्षय कुमारने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने कोरोना झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची हे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोरोनाची पहिली लाट आली आणि गेली. आता दुसरी लाट उतरणीला लागलीये आणि तिसरीही लाट येऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. माणसं आज डोळ्यासमोर चालताना बोलताना दिसतात, तर थोड्याच दिवसांत त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडते. हे सर्व मन सुन्न करणारं आहे. फेसबुकवरही श्रद्धांजलीच्याच पोस्ट आजकाल बघायला मिळतात. आपल्याला वाटणारही नाही इतक्या कमी वयाची लोकं कोरोनामुळे दगावली आहेत. तुमच्या माझ्या ओळखीतली म्हणजेच इथे प्रत्येकाच्या ओळखीतले कुणी ना कुणी तरी करोना महामारीचे बळी पडले आहेत.

अशा या अस्थिर वातावरणामध्ये आपण स्वत:ची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. एकमेकांसोबत बोललं पाहिजे, लॉकडाऊनमुळे सगळे घरी असल्यामुळे आपापसात तणाव निर्माण होऊ शकतो. हा तणाव घरातल्या सदस्यांनी एकमेकांना समजून घेऊन, बोलून दूर करणे हे खूप जास्त गरजेचे झाले आहे .

आपले बॉलीवूड सेलिब्रेटी तसेच मराठीतील कलाकारदेखील आपल्या चाहत्यांना आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून कोरोना काळामध्ये घ्यावयाची काळजी देणाऱ्या पोस्ट शेर करत असतात. बाहेर जाताना नियमितपणे मास्क वापरले पाहिजे. दर अर्ध्या पाऊण तासाने हात धुतले पाहिजे. कोरोना होऊ नये यासाठी असलेल्या ह्या सूचना आपणा सर्वाना आताशा माहीत आहेत. ह्याचे पालन करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे ओळखून वागल्यास कोरोना पासून दूर राहण्यास मदतच होईल.

अक्षय कुमारने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने कोरोना झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची हे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने खालील पाच गोष्टी सांगितल्या आहेत.

*जर तुम्हाला कोरोना झाल्यासारखे वाटत आहे तर रिपोर्ट येण्याची वाट न पाहता, घरी क्वारंटाइन झालं पाहिजे. कमीत कमी दहा दिवसांसाठी तरी.

*जर तुम्ही आजारी आहात असे वाटत असेल तर स्वतः स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

*तुमच्या घरी जर कोणाला कोरोना झाला असेल तर घरातील इतर सदस्यांनी देखील सतत हात धुतले पाहिजेत.

*जेव्हा कोरोना पेशंटला जेवण देण्यासाठी जाता तेव्हा मास्क हा वापरलाच पाहिजे.

*जर तुमचा ताप कमी नाही आला आणि तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांसोबत संपर्क साधला पाहिजे.

अक्षय कुमार नेहमी सामाजिक मुद्द्यांवरील सिनेमे बनवतो. या सिनेमांमुळे तो चर्चेत असतो. आतादेखील कोरोनापासून आणि कोरोना झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची ह्याचा व्हिडिओ आपल्या चाहत्यासाठी शेअर केला आहे.