bihar man scorpio shaped water tank

bihar man scorpio shaped water tank काही माणसांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच हटके असते. बिहारमधील एका व्यक्तीने त्याचे महिंद्रा स्कॉर्पियो‎‌वर म्हणजेच त्याच्या चारचाकीवरचे (Mahindra Scorpio )प्रेम असेच हटके स्टाईलनी व्यक्त केले आहे. सध्या त्याच्या या प्रेमाची सगळीकडे चर्चा आहे. बिहारमधील भागलपूरमधील एक घर सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घराचा आणि चारचाकी प्रेमाचा काय संबंध आहे हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल. सध्या हो फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या चारचाकीच्या प्रेमाची कहाणी…

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील इंतसर आलम यांनी आपल्या आयुष्यात स्कॉर्पिओ ही गाडी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीच्या प्रेमापोटी त्यांनी चक्क आपल्या चार मजली घरावर या गाडीचे मॉडेल उभे केले आहे. ही महिंद्रा स्कॉर्पियो‎‌च्या आकाराची पाण्याची टाकी मुकुटाप्रमाणे घऱावर बांधण्यात आली आहे. का तर म्हणे त्याला महिंद्रा स्कॉर्पियो‎‌ आवडते. प्रेम तर सगळेच करतात मात्र पण असा प्रेम व्यक्त करणारा हा पहिलाच असावा. सध्या त्याच्या या घऱाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टेरेसवरील या गाडीचे सेम मॉडेल तयार केले गेले असून सेम क्रमांकाची नंबर प्लेट देखील यावर लावण्यात आली आहे. ही गाडी तयार करण्यात आली नसून गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. या स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना त्याच्या पत्नीची होती.

इंतासर आलम जेव्हा आगऱ्यात त्यांच्या पत्नीसोबत आले होते तेव्हा त्यांनी एक घरावर अशाप्रकारची पाण्याची टाकी पाहिली होती. तेव्हाच त्यांनी ठरवले होते आपण देखील घरावर अशीच टाकी बनवायची. ही पाण्याची टाकी तयार करण्यासाठी त्यांना २.५ लाखापेक्षा जास्त खर्च आला आहे. कुणी तरी त्यांच्या घराचा फोटो काढला आणि ट्वीटरवर शेअर केला आणि काही क्षणातच हा फोटो व्हायरल झाला.

पंजाबमध्ये अशाप्रकरच्या मोठ्याप्रमाणात विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या घराच्या वरती पाहण्यास मिळतात. काहींच्या घरावर प्रेशर कुकर तसेच व्हिस्कीच्या बाटलीच्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या देखील पाहायला मिळतील.

स्कॉर्पियो ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची एसयूव्ही आहे. चालवायला दणकट, दिसायला आकर्षक आणि परवडणारी अशी तिची वैशिष्ट्य आहेत.