सध्याचा काळ डिजिटल आहे आणि डिजिटल युगामध्ये इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांनी धुमाकूळ घातला आहे. आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अभिनेत्री आपापल्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियावर कोणता ना कोणता ट्रेंड चालू असणे हे अतिस्वाभाविक आहे. सध्या बॉलीवूडमध्ये एक नवीन ट्रेंड आला आहे. ज्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांचे जुने फोटो आणि नवीन फोटो एकाच फोटोमध्ये कोलाज केलेले पाहायला मिळतात.
आता तुम्ही म्हणाल की इतके भन्नाट फोटो कोणी बनवले? हे फोटो बनवलेत केरळमधील एक डिजिटल आर्टिस्ट शमीम लुकमानने. शमीम हा केरळमध्ये राहतो आणि तिथेच तो आपला आर्ट स्टुडिओ चालवतो. आपल्या स्टुडियोमध्ये तयार केलेले हे फोटो त्याने सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटवर टाकले होते आणि काही कालावधीच्या आतच हे फोटो तुफान व्हायरल झाले.
शमीम फोटो मॅनिप्युलेटर म्हणून देखील काम करतो. फोटोशॉपमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे https://www.madcod.in/ ही वेबसाईट चालवतो. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर त्यांनी बनवलेले सेलिब्रेटींचे ट्रेंडिंग फोटो पाहू शकता.
त्याने बनवलेले शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, तमन्ना, हृतिक रोशन, अक्षयकुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण तसेच साऊथ चित्रपट सृष्टीतीलही बऱ्याच कलाकारांचे फोटो खूपच व्हायरल झालेले आहेत. शमीम याच्या सोशल मीडिया अकाउंटला भेट दिली तर अजून बऱ्याच सेलिब्रेटींचे असे व्हायरल ट्रेंडिंग फोटो तुम्हाला पाहायला मिळतील