गुरू रंधवा याचा नवीन अल्बम प्रदर्शित झाला आहे. नैन बंगाली असे या अल्बमचे नाव आहे.

बॉलीवूड सिनेमा आणि पंजाबी गाणे यांचं नातं खूप जुनं आहे. सिनेमाला प्रमोट करण्यासाठी एक तरी पंजाबी गाणं सिनेमामध्ये असावंच असा आग्रह दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा असतोच असतो. लोकांना देखील पंजाबी गाणी खूप आवडतात. अलीकडच्या काळातील गुरू रंधवा म्हणा किंवा बादशहा, यो यो हनी सिंग, नेहा कक्कड या पंजाबी गायकांनी तरुणांच्या हृदयावर अक्षरशः राज्य केलेले आहे. नुकताच गुरू रंधवा याचा नवीन अल्बम प्रदर्शित झाला आहे. नैन बंगाली असे या अल्बमचे नाव आहे. हिंदी आणि पंजाबी अशा मिक्स भाषेमधील हे गाणे नुकतेच प्रदर्शित झालेले आहे. टी सीरिजच्या ऑफिशियल यू ट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

या गाण्याचे कम्पोझिशन स्वतः गुरू रंधवा याने केले आहे. त्याचप्रमाणे हे गाणेही त्याने स्वतः लिहिलेले आहे. या व्हिडिओ अल्बमचे दिग्दर्शक डेव्हिड झैनी आहेत. या नवीन व्हिडीओ अल्बमसाठी गुरूने केसांना ग्रे हेअर कलर वापरला आहे. तरुणींमध्ये गुरूच्या गाण्यांची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ त्यांच्या लूक्सचीही असते. ह्या नव्या लूक मध्ये गुरू एकदम डॅशिंग दिसत आहे.

मागे आलेल्या डूब गये या त्याच्या गाण्याने बरेच रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. या गाण्यामध्ये त्याच्यासोबत उर्वशी रौतेला दिसली होती. गुरू रंधावा बऱ्याच वेळा इंडिपेंडेंट व्हिडिओ अल्बम बनवतो. त्याची बरीच गाणी आजवर हिट ठरलेली आहेत. हाय रेटेड गबरू, लाहोर, बंजा तू मेरी राणी त्याचप्रमाणे तेरी गली, स्लोवली या सर्व गाण्यांनी सर्वात जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. हॉलीवुड सिंगर पिटबुल सोबतसुद्धा गुरू रंधवाने एका व्हिडीओ अल्बमसाठी काम केले होते.