करीनाने नुकताच 'करिना कपूर खानज प्रेग्नंसी बायबल' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामधून तिचे तिच्या दुसऱ्या मुलासोबतचे काही फोटो एका फॅनने प्रसिद्ध केले आहेत.

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याला कोण ओळखत नाही. तैमूर अख्ख्या भारतात प्रसिध्द आहे. एखाद्या मोठ्या सेलिब्रेटी पेक्षाही जास्त प्रसिद्धी तैमुर अली खान याला मिळते. करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. दुसऱ्या वेळेसही त्यांना मुलगाच झाला आहे. त्या मुलाचं नाव त्यांनी जेह असे ठेवले आहे.

तैमूर अली खानचे ज्यावेळी नाव ठेवले होते, त्यावेळी करीना कपूर आणि सैफ अली खान या दोघांनाही नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले हाेते. तैमुर हा एक हुकूमशाही राजा होता. त्याने लोकांवर अन्याय केले होते. अशा क्रूर राजाचे नाव तुम्ही तुमच्या मुलाला का देता? असा प्रश्नही चाहत्यांनी त्यांना विचारला होता. पण या कोणत्याही ट्रोलिंगला न जुमानता त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूरच ठेवले होते. आता त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी जेह असे ठेवले आहे. जेह नावावरुनदेखील करिना कपूर आणि सैफ अली खान यांना बरंच ट्रोल केलं जातंय.

करीनाने नुकताच ‘करिना कपूर खानज प्रेग्नंसी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामधून तिचे तिच्या दुसऱ्या मुलासोबतचे काही फोटो एका फॅनने प्रसिद्ध केले आहेत. जरी करिना कपूरने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  आपल्या दुसऱ्या मुलासोबतचे कोणतेही फोटो शेअर केले नसले, तरी तिच्या फॅन्सनी मात्र उत्साहाच्या भरात ते फोटो प्रसिद्ध केले आहेत.

करिना कपूर आगामी लाल सिंग चड्ढा या आमिर खानसोबतच्या सिनेमामध्ये दिसणार आहे. लाल सिंग चड्ढा हा हॉलीवूडच्या द फॉरेस्ट गम्प या सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. बरेच अकॅडमी अवॉर्ड्स आणि ऑस्कर अवॉर्ड्स फॉरेस्ट गम्प या सिनेमाने आपल्या नावावर लिहून ठेवले आहेत. त्यामुळे लाल सिंग चड्ढा हा सिनेमादेखील  आमिर खान आणि करिना कपूर यांच्या करियरमध्ये एक महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे. सैफ अली खान याचा भूत पोलीस हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.