एका अवॉर्ड शोमध्ये विकीने गमतीमध्ये कॅटरिना कैफला प्रपोज केले होते. जरी गंमत वगैरे चालली असली तरी त्या दोघांची केमेस्ट्री कोणापासूनही लपली न्हवती.

आपल्या तुफान हटके डान्स स्टाईलमुळे कॅटरिना कैफ बॉलीवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कॅटरिना कैफ आणि तिचे प्रेमसंबंध सुरुवातीपासूनच एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ती सलमान खानसोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत होती. काही कालावधीनंतर हे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यानंतर तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेले. ते दोघे जवळपास सहा ते सात वर्षे एकमेकांसोबत होते. पण काही कारणांमुळे ते प्रेमसंबंध देखील संपुष्टात आले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र आहेत पण कॅटरिना कैफ अजूनही सिंगल आहे असे म्हटले जात होते.

तिचे चाहते आणि बॉलीवूडमध्ये सर्वांना कॅटरिना कैफच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्याची खूपच उत्सुकता होती. पण आता या सर्व चर्चांना फुलस्टॉप देण्याची वेळ आली आहे. कारण कॅटरिना कैफ लवकरच विकी कौशल सोबतच्या आपल्या प्रेमसंबंधांना सोशल मीडियावर जाहीर करून ऑफिशियल करणार आहे.

२०१२ मध्ये लव शव ते चिकन खुराना या सिनेमातून विकी कौशलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जवळपास तीन वर्षे त्याचा कोणता चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २०१५ मध्ये मसान ह्या सिनेमात तो दिसला. ब्रोकन बट ब्युटिफुल फेम हरलीन सेठीला तो त्यावेळी डेट करायचा. काही कारणांमुळे त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यानंतर एका अवॉर्ड शोमध्ये विकीने गमतीमध्ये कॅटरिना कैफला प्रपोज केले होते. जरी गंमत वगैरे चालली असली तरी त्या दोघांची केमेस्ट्री कोणापासूनही लपली न्हवती. तेव्हापासूनच विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागल्या होत्या. नंतर बऱ्याच वेळा दोघांना एकत्र पार्टींमध्ये, डिनर डेट, मूव्ही प्रमोशन्स आणि एकमेकांच्या घरी येताजाता पाहिले जायचे.

कॅटरिना कैफच्या बहिणीने मधे एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये कॅटरिना कैफ, तिची बहिण होती तर फोटोमधील काचेवर विकी कौशलचे प्रतिबिंब दिसत होते. त्यामुळे त्यांच्यामधील प्रेम संबंधांना एक प्रकारे पुष्टीच मिळाली होती. आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की लवकरच दोघे आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आपले प्रेमसंबंध ऑफिशियली जाहीर करणार आहेत. जर त्यांनी आपले प्रेमसंबंध जाहिर केले तर त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल ह्यात काही शंकाच नाही.