'माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट, माझं गुपितच म्हणा हवं तर, लवकरच खास.. तुमच्यासाठी' अशा कॅप्शनसहीत ही बातमी तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

नेहमी हसतमुख असणारी, बोलक्या चेहऱ्याची गोड अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो होस्ट करायची. त्याचप्रमाणे बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील प्राजक्ता झळकली आहे. स्टार प्रवाहवरील सुवासिनी या मालिकेतून तिने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आलेल्या बऱ्याच मालिकांमध्ये तिने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची झलक नेहमीच दाखवली आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे तिला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवले आणि कमी कालावधीत ती सर्वांची लाडकी अभिनेत्री बनली. नकटीच्या लग्नाला यायचं या मालिकेतील नूपुर या पात्रामुळे देखील तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

अशी ही सुंदर अभिनेत्री इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो नेहमी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक क्रिएटीव्ह आणि हटके फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एका वहीमध्ये प्राजक्ता काहीतरी लिहिताना दिसून येतेय. प्राजक्ताकडून लवकरच एक सुंदर भेट असे तिने या फोटोवर लिहिले आहे. ‘माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट, माझं गुपितच म्हणा हवं तर, लवकरच खास.. तुमच्यासाठी’ अशा कॅप्शनसहीत ही माहिती तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

आता प्राजक्ता नक्की कोणता प्रोजेक्ट घेऊन येतेय? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. ती सिनेमाची स्क्रिप्ट लिहितेय की शॉर्टफिल्मची की आपल्या कवितां आणि कथांचा संग्रह पुस्तकरूपात प्रकाशित करत आहे. हे पाहणं खूप एक्सायटिंग असणार आहे. तिच्या या पोस्टवर बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रेटींनी कमेंट करुन आपले प्रेम व्यक्त केले आहे.