राखी सावंत कोरोना व्हायरस आणि बाबा रामदेव ह्यांची तुलना करताना ती म्हणते की कोरोना व्हायरस बिल्कुल बाबा रामदेव ह्यांच्या सारखाच झालाय.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेलं मराठमोळं नाव म्हणजे राखी सावंत. करिअरच्या सुरूवातीला सिनेमात छोटे छोटे रोल करून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. नृत्य कलेत पारंगत असल्यामुळे ती सिनेमात आयटम साँग्ज करू लागली. चित्रपट सृष्टीतील तिची अभिनयाची कारकीर्द हा चर्चेचा विषय नसला तरीसुद्धा राखी नेहमी चर्चेत असते ती तिच्या भन्नाट, तुफान आणि मजेशीर अशा वक्तव्यांमुळे. कधी काय तर कधी काय असे तिचे काही ना काही चालूच असते.

मागे तिने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणूक लढवली होती. तिचे उमेदवारी चिन्ह होते हिरवी मिरची. अगदी थोडक्यात म्हणजे शंभराच्या आतच तिला मते मिळाली होती. प्रचारासाठी देखील तिने हिरव्या मिरचीच्या रंगाचा हिरवा ड्रेस घालून प्रचार केला होता. म्हणजे एकंदर सर्वच मजेशीर होतं. कधी कंगना राणावत, कधी सनी लिओनी, कधी तनुश्री दत्ता तर कधी सलमान खान यांच्यावरदेखील ती भन्नाट वक्तव्ये मीडियासमोर देत असते. कधी तिचा पेहरावा, कधी तिची वक्तव्ये, कधी तिची नाटकबाजी अशा कुठल्या ना कुठल्या कारणाने राखी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ही कारणं देखील सांगावी तितकीच थोडी आहेत.

राखी सावंत इंस्टाग्रामवरून व्हिडिओ आणि फोटोज त्याद्वारे आपले मजेशीर वक्तव्य आणि आपले तुफान विनोदी मत दरवेळी आपल्या चाहत्यांना सांगत असते. इंडियन आयडॉल १२ चे शूटींग संपवून नुकतीच ती मुंबईत आलीये. तेव्हा पत्रकारांनी तिला गाठले असता तिने अतिशय मजेशीर असे एक वक्तव्य कोरोना व्हायरस आणि बाबा रामदेव ह्यांच्या संदर्भात दिले आहे. कोरोना व्हायरस आणि बाबा रामदेव ह्यांची तुलना करताना ती म्हणते की कोरोना व्हायरस बिल्कुल बाबा रामदेव ह्यांच्या सारखाच झालाय, तो कधी येतो, कधी जातो, तर कधी अचानकच येतो आणि अचानक गायबही होतो.

लॉकडाऊनच्या काळातदेखील राखीचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. कधी ती भाजी घ्यायला गेली असताना, कधी योगासनासाठी गेलेली असताना पत्रकार तिला बरोबर गाठतात. अशा ह्या मजेशीर स्वभावाच्या राखीने मध्ये तिच्या लग्नाचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ज्यामध्ये तिच्या पतीचा चेहरा मात्र अजिबात दिसत नव्हता. त्यामुळे सर्वांना आजदेखील हा प्रश्न आहे की राखी सावंतचा नवरा नक्की आहे तरी कोण? तिने खरेच लग्न केले आहे की उगीचच ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी काहीही सांगत असते? तुम्हाला काय वाटतं?