कलाकारांनी नाण्यांपासून साकारलेली भगवान श्रीराम यांची ही कलाकृती (फोटो एएनआयवरुन साभार)

भगवान श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचे कार्य सुरु झाले आहे. अशातच आता कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथील काही कलाकारांनी एकत्र येत श्रीरामांची एक अनोखी कलाकृती तयार केली आहे. या कलाकारांनी १ रुपया आणि ५ रुपये या नाण्यांचा वापर करत भगवान राम यांची भव्य कलाकृती बनवली आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी आता नागरिक गर्दी करत आहेत. ही कलाकृती जवळून पाहिल्यास तुम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळेल इतकी सुंदर आणि भव्यपणे ती साकारण्यात आली आहे. ही भव्य कलाकृती बनवण्याकरता या कलाकारांनी १ आणि ५ रुपयांच्या तब्बल ६० हजार नाण्यांचा वापर केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात ट्विट करत याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी या कलाकारांशी संवादही साधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरुमधील एका संघटनेने भगवान श्रीराम यांची ही विशाल कलाकृती साकारली आहे. या संघटनेचे नाव राष्ट्र धर्म ट्रस्ट असे आहे. राष्ट्र धर्म ट्रस्टने बंगळुरु या शहरात लालबागच्या पश्चिम गेटवर ही अनोखी रचना बनवली आहे. दर्शकांना ही कलाकृती पाहता यावी याकरता ही रचना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलताना यातील एक कलाकार म्हणाला की, या भव्य कलाकृतीला पाहण्यासाठी आम्ही १ आणि ५ रुपयांच्या तब्बल ६० हजार नाण्यांचा वापर केला आहे.

हा कलाकार पुढे बोलताना म्हणाला की, भगवान श्रीराम यांची ही कलाकृती बनवण्याकरता आम्ही जवळपास 2 लाख रुपयांच्या 60 हजार नाण्यांचा वापर केला आहे. ही कलाकृती पाहण्याकरता नागरिकांची या ठिकाणी गर्दी होताना दिसतेय. अयोध्येत सध्या श्रीराम यांच्या मंदिराची उभारणी सुरु असून श्रीराम जन्मभूमी तीर्थट्रस्ट तर्फे याचे काम सुरु आहे.