Rohan preet singh expresses his love for wife neha kakkar via instagram post

नेहा कक्कड ही सध्याची बॉलिवूडमधील आघाडीची गायिका आहे. नवीन रिलीज होणाऱ्या जवळपास प्रत्येक सिनेमांमध्ये नेहाचे एकतरी गाणे हे असतेच असते. दंगलमधील नैना असो किंवा मिले हो जब हम को किंवा गोवावाले बीच पे असो. वेगवेगळ्या प्रकारची गाणी नेहा अगदी सहजतेने आणि सुंदरतेने गाते. नेहा अगदी साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेली आणि आज ती बॉलिवूडमधील एक टॉपची गायिका झाली आहे. हा शून्यातून निर्माण करण्याचा प्रवास प्रत्येकालाच जमतो असे नाही. पण नेहाने हा प्रवास आपल्या कष्टातून आणि मेहनतीच्या जोरावर पार केला. म्हणून ती आज यशाची दावेदार आहे.

नेहा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेचा विषय असते. हिमांश कोहलीला नेहा डेट करायची. पण काही कारणाने त्या दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. नेहा नंतर रोहनप्रीत सिंगला डेट करू लागली. ऑक्टोबर २०२० मध्ये रोहन आणि नेहा लग्न बंधनात अडकले. दोघेही त्यांनतर आपापल्या इंस्टाग्रामवर दोघांचे सोबतचे बरेच फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोमधून त्यांचे निखळ प्रेम साफ दिसते.

नेहाचा आज वाढदिवस आहे आणि रोहनने इंस्टाग्रामवर तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. रोहन त्याच्या पोस्टमध्ये लिहितो की, नेहा तू माझं प्रेम आहेस आणि माझी राणीही. आजवर मी जितकी तुझी काळजी घेतली त्यापेक्षाही जास्त काळजी मी येणाऱ्या प्रत्येक दिवशी घेईन. मला तू खूप आवडतेस. आणि मी माझे सौभाग्य मानतो की मी तुझा नवरा आहे. मी प्रॉमिस करतो की, आयुष्यभर तुला सुखात ठेवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव.

तू हा मेसेज जेव्हा पाहशील तेव्हा नक्की हसशील, अस मला वाटतंय. मला खूप छान वाटतं जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. आयुष्यभर तू माझीच असणार आहेस. देव तुला आशीर्वाद देवो.

आपल्या नवऱ्याचा इतका प्रेमळ अंदाज बघून नेहा नक्कीच खूश झाली असणार ह्यात काही शंकाच नाही.