लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त मंजिरी भावे यांनी सुबोध भावे यांना एक सायकल भेट दिली आहे.

एका यशस्वी पुरूषामागे एका बाईचा हात असतो. हे म्हणतात ते काही खोटे नाही. एकमेकांवर प्रेम करणारी, आधार देणारी जोडपी, एकमेकांना साथ देत एकमेकांच्या आयुष्यात सुवर्णकाळ लिहू शकतात. काल सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांनी लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सुबोध भावे यांनी आपल्या लग्नातील काही फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ‘जास्त काही न लिहिता,’तू तिथे मी’ इतकंच लिहेन अशा कॅप्शनसह त्यांनी आपलं प्रेम इन्स्टाग्रामद्वारे व्यक्त केलं होतं.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त मंजिरी भावे यांनी सुबोध भावे यांना एक सायकल भेट दिली आहे. आज त्यांनी त्या सायकलसोबतचा एक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटो सोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शन देखील शेअर केले आहे. ‘वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल   च्या किमतीचा तर हा परिणाम नसेल? काहीही असलं तरी सायकल फार सुंदर आहे आणि आरोग्यास खूप जास्त फायदेशीर आहे. असे देखील त्यांनी या कॅप्शन मध्ये लिहिले आहे.

कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, आणि डॉ काशिनाथ घाणेकर यांसारख्या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवणारे अभिनेते म्हणजेच सुबोध भावे. थिएटर असो, मालिका असो किंवा सिनेमा असो एका कलाकारासाठी कोणतही काम छोटं किंवा मोठं अजिबात नसतं. असं सुबोध भावेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे मिळेल ते काम करण्यावर मी भर देतो असेही ते म्हणाले होते. आभाळमाया या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यामध्ये इन्स्पेक्टर मोहन हे पात्र त्यांनी निभावले होते. अशा या दिग्गज कलाकार आणि बऱ्याच उत्तमोत्तम सिनेमांमध्ये काम केलेले आहे

सुबोध भावे यांचा बस्ता हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांची चंद्र आहे साक्षीला ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये बरेच व्यत्यय आले. त्यामुळे ही मालिका बंद करावी लागली होती.