बघतोय रिक्षावाला आणि बाई वाडयावर या या दोन गाड्यांमुळे मानसी महाराष्ट्रात प्रचंड फेमस झाली होती.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. मानसी मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तर प्रदीप एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तुफान या सिनेमांमध्ये त्याने एक छोटा पण महत्त्वपूर्ण रोल निभावला होता. हा त्याचा पहिलाच बॉलीवूड सिनेमा होता. मानसी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. मानसीच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय बोलके असतात.

कधी हरयाणवी पारंपरिक ड्रेस घालून, तर कधी साडीमध्ये, तर कधी मॉडर्न अंदाजात ती बरेच रील्स बनवत असते. नुकताच प्रदीपने आणि मानसीने अभिनेता गोविंदाच्या एका गाण्यावर एक रील बनवला आहे. ज्यामध्ये प्रदीप गाण्यावर लिपसिंकग करताना दिसून येतोय तर मानसी त्याच्याकडे खट्याळ नजरेने पाहताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. मानसी बऱ्याच ब्रँडसाठी फोटोशूट करताना देखील दिसून येते.

https://www.instagram.com/reel/CSgv1LxjqAm/?utm_source=ig_web_copy_link

मानसी इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. बऱ्याच जुन्या गाण्यांवर ती व्हिडिओज आणि रिलस बनवून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. लग्नानंतर ती आपला नवरा प्रदीपसोबत देखील बरेच रील्स बनवताना दिसून येते. तर कधी कधी ती आपल्या सासू सोबतही डान्स रिल्स बनवताना दिसून येते. मागे सासू सुनांचा एक डान्स रील प्रचंड व्हायरल झाला होता. २०२० मध्ये तिने एक डान्स रील शेअर केला होता. त्यानंतर ती प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयची डमी आहे. अशी बरीच मोठी चर्चा मीडियामध्ये झाली होती. बघतोय रिक्षावाला आणि बाई वाडयावर या या दोन गाड्यांमुळे मानसी महाराष्ट्रात प्रचंड फेमस झाली होती. त्यानंतर तिच्याकडे एक डान्सिंग क्वीन म्हणूनदेखील पाहिले जात होते. प्रत्येक अवॉर्ड शोमध्ये मानसीचा डान्स आवर्जून असतोच असतो. तर मानसी आणि प्रदीपचा हा नवीन रील तुम्ही पहिला का ?