धुमधडाका, कशासाठी प्रेमासाठी, अशी ही बनवाबनवी अशा अनेक मराठी सुपरहिट सिनेमांमध्ये निवेदिता अशोक सराफ दिसल्या होत्या.

होणार सून मी या घरची या मालिकेतील तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी आणि बबड्या यांची प्रमुख भूमिका असणारी मालिका अग्गंबाई सासूबाईने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक, निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असणारी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. म्हणूनच या मालिकेनंतर अगं बाई सूनबाई ही नवी मालिका झी मराठीवर सुरु करण्यात आली होती. अद्वैत दादरकर, उमा पेंढारकर, निवेदिता सराफ, गिरीश ओक हे या नव्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येतात. अग्गंबाई सासूबाई या मालिकेमध्ये सासू अगदी साधीसुधी आणि सून नव्या विचारांची पण समतोल सांभाळणारी अशी दाखवली होती. तर अगबाई सूनबाई या मालिकेमध्ये सासू एक मॉडर्न बिझनेस वूमन आणि सून साधी, सरळ, सोज्ज्वळ अशी दाखवली आहे. ह्या साध्या, सरळ, सोज्ज्वळ उमाचा आज वाढदिवस आहे. अन सासूबाई निवेदिता सराफ यांनी तिला वाढदिवस विश करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ‘हॅपी बर्थडे डिअर उमा हॅव अ वंडरफुल डे अहेड’असे कॅप्शन देत निवेदिता सराफ यांनी उमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपट आणि मालिकांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ युट्यूबवरदेखील बऱ्याच सक्रिय असतात. युट्यूबवर त्यांचे स्वतःचे एक चॅनल आहे, ज्यावर त्या विविध रेसिपी बनवून दाखवतात. त्याचप्रमाणे त्यांचा स्वतःचा वूमन असेसरींचा बिझनेस देखील आहे. एक प्रभावी बिझनेस वुमन, एक उत्तम शेफ आणि मुख्य म्हणजे एक उत्तम अभिनेत्री निवेदिता सराफ आहेत. त्यांनी अपणापण या हिंदी सिनेमातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. मराठी चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. धुमधडाका, कशासाठी प्रेमासाठी, अशी ही बनवाबनवी अशा अनेक मराठी सुपरहिट सिनेमांमध्ये निवेदिता अशोक सराफ दिसल्या होत्या.