जवळपास एका महिन्याच्या कालावधीनंतर शिल्पा पुन्हा चित्रीकरण करण्यास सेटवर हजर झाली आहे.

हंगामा दोन या सिनेमामध्ये शिल्पा शेट्टी नुकतीच झळकली होती. हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच तिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफीच्या केसवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिने रिएलिटी शो सुपर डान्सर सिझन फोरच्या शोमधून देखील रजा घेतली हाेती. तिला शोमधून काढून टाकण्यात आले आहे, अशी अफवा त्यावेळी पसरली होती. तिच्या ऐवजी करिश्मा कपूरने शोचे शूटिंग देखील केले होते. पण नुकतेच शिल्पा शेट्टीला रिएलिटी शो सुपर डान्सर सीझन फोरच्या सेटवर पाहण्यात आले. त्यामुळे या रिएलिटी शोमध्ये शिल्पा शेट्टी पुनरागमन करणार आहे हे मात्र निश्चित.

मीडियामध्ये ही बातमी येताच नेटकऱ्यांनी राज कुंद्राला पुन्हा एकदा ट्रोलिंगच्या तलवारीवर धरले आहे. राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीचे करिअर उद्ध्वस्त झाले. शिल्पा शेट्टीची इमेज खराब झाली. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी असे देखील म्हटले आहे की,’शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावना साफ झळकत आहे.’ काहीही असले तरीही शिल्पा शेट्टीने मात्र कोणत्याही मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलणे टाळलेले आहे. जवळपास एका महिन्याच्या कालावधीनंतर शिल्पा पुन्हा चित्रीकरण करण्यास सेटवर हजर झाली आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी देखील यामध्ये सहभागी आहे. अशा आणि तशा बऱ्याच बातम्यांनी जोर धरला होता. याच्याविरूद्ध शिल्पा शेट्टीनं कोर्टामध्ये तक्रारही दाखल केली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक ऑफिशियल स्टेटमेंट तिने जाहीर केले होते. ‘तिच्या फॅमिलीसाठी सध्याचा काळ खूप कठीण आहे आणि या काळामध्ये सगळेजण तुम्ही आमच्या प्रायव्हसीची काळजी घ्याल. अशी मी इच्छा व्यक्त करते.’ असे तिने या स्टेटमेंट द्वारे सगळ्यांना कळवले होते.