'आता जल्लोष करत महाराष्ट्र नाचणार, जेव्हा डान्सच्या रंगमंचावर येणार तुमच्या शहरातील तुमचे सुपरस्टार' मी होणार सुपरस्टार, जल्लोष डान्सचा हा शो २१ ऑगस्टपासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होणार आहे.

जत्रा सिनेमातील ‘ये गो ये, ये मैना’ हे अंकुश चौधरीवर चित्रित झालेले गाणे सुपरहिट झाले होते. या सिनेमातील अंकुशचा डान्स, त्याचे लुक्स यांनी प्रेक्षकांना घायाळ केले होते. अजय अतुल यांनी कम्पोजिशन आणि म्युझिक दिलेले हे गाणे आजही लोक प्रचंड आवडीने ऐकतात. असं म्हणतात, जेव्हा तुम्ही डान्स करता तेव्हा कोणीही तुम्हाला पाहात नाहीये असा डान्स करावा. डान्स आपल्या आत्म्याला सुखावून जातो. चिंता, निराशा, टेन्शन, भिती सर्वकाही डान्समुळे दूर होऊ शकते. डान्सला आपण एक मेडिटेशनची थेरपी म्हणूनदेखील पाहू शकतो. तर हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा की, स्टार प्रवाह या वहिनीवर एक नवा डान्स शो सुरु होणार आहे. आपल्या लाडक्या सुपर डान्सर हीरो अंकुश चौधरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या शो विषयीची घोषणा करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

‘आता जल्लोष करत महाराष्ट्र नाचणार, जेव्हा डान्सच्या रंगमंचावर येणार तुमच्या शहरातील तुमचे सुपरस्टार’ मी होणार सुपरस्टार, जल्लोष डान्सचा हा शो २१ ऑगस्टपासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होणार आहे. या शोची घोषणा करणाऱ्या पोस्टवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केली आहे. सई ताम्हणकरने ‘हे हॅण्डसम’ अशी कमेंट केली आहे तर सुयश टिळकने या पोस्टसाठी लव्ह रिॲक्ट केले आहे.

कोरोनाचा प्रभाव जसा जसा कमी होतोय तसतसं मालिका आणि चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. उमेश कामत, मुक्ता बर्वे, प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संजय नार्वेकर या मोठमोठय़ा कलाकारांच्या मागोमाग आता अंकुश चौधरी हा मोठा कलाकार देखील टीव्हीवर पुनरागमन करतोय. सुना येती घरा या सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. लॉक डाऊन, दगडी चाळ आणि महेशचा बदला हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होतील.