असूर चा सेकंड सीजन प्रदर्शित होणार आहे.

इस प्यार को क्या नाम दूं या मालिकेमधील अर्णव सिंग रायजादा असो किंवा असूर या वेब सीरिज मधील निखिल नायर असो या दोन्हीही भूमिका बरूण सोबतीने अतिशय उत्कृष्टरित्या निभावल्या होत्या. अर्णवसिंग रायजादा एक खडूस, चिडका पण तितकाच मनाने प्रेमळ आणि हळवा असा होता. तर असुर मधील निखिल नायर प्रचंड टॅलेंटेड, आपल्या कामाला पूर्णपणे सर्वस्व मानून जीव ओतून काम करणारा, एक जबाबदार भारतीय नागरिक दाखवला होता. या दोन्हीही भूमिका बरूणने आपल्या उत्तम अभिनयामुळे जिवंत केल्या होत्या यात काही शंकाच नाही.

असा हा हुशार, गुणी, देखणा बरून इंस्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या प्री बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या मुलीच्या प्ले एरियामध्ये त्यांनी हे सेलिब्रेशन केले आहे. सनाया इराणी ही इस प्यार को क्या नाम दूं मध्ये बरूणची सहकलाकार होती,तिने खुशी हे कॅरेक्टर प्ले केले होते, ती आणि तिचा नवरा मोहीत सेहगल, साक्षी, अक्षय डोगरा, दिलजीत कौर या सर्वांनी मिळून या प्री बर्थडे सेलिब्रेशन पार्टीचे सरप्राइज दिले होते. या सर्वांनी पार्टीमध्ये खूप एन्जॉय केलेला या फोटोंमधून दिसून येतोय.

असुर या वेबसीरिजमध्ये बॉलीवूडमधील सुपरस्टार अर्शद वारसी देखील एका प्रमुख भूमिकेमध्ये होता. स्क्रीनवरील  बरुणच्या वावराने, त्याच्या अभिनयामुळे बरूणने आपले अस्तित्व स्पष्टपणे आणि ठळकपणे जाणवून दिले आहे. इतक्या ताकदीने एका प्रस्थापित कलाकारांसमोर आपली भूमिका बजावणे ही देखील एक कलाच आहे असे म्हणावे लागेल. आणि बरुणने आपल्या भूमिकेला न्याय देत आपले काम अतिशय उत्कृष्टरित्या निभावले आहे. लवकरच असूरचा सेकंड सीझन प्रदर्शित होणार आहे. आणि या सिझनमध्ये देखील बरुण आपल्या टीम सोबत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करण्यास सज्ज आहे.