'निरमा, वॉशिंग पावडर निरमा' असे कॅप्शन ऋतुजाने या फोटोसाठी दिले आहे.

साध्या, सरळ आणि सोज्वळ मुलीची भूमिका करणारी ऋतुजा बागवे सध्या इन्स्टाग्रामवर तिच्या भन्नाट आणि वेगवेगळ्या गेटअप मधील फोटो शूटमुळे चर्चेचा विषय ठरताना दिसून येते. कधी वेडिंग गाऊन तर कधी हटके डिझायनर ड्रेस तर कधी एकदम हॉट ऍण्ड बोल्ड साडीमधील फोटो. ऋतुजाचा प्रत्येक लुक तिच्या चाहत्यांना आवडतो. चाहते दरवेळी तिच्या या फोटोंवर बरेच लाईक्स आणि कमेंट्स करून आपल्या प्रेमाचा वर्षाव करत असतात.

नुकताच ऋतुजाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी एक फोटो शेअर केला आहे. ग्रे रंगाची फुले असणारा निळ्या रंगाचा वनपीस तिनं या फोटोमध्ये घातला आहे. वाऱ्याच्या झोताने हा ड्रेस फोटोमध्ये उडताना दिसून येतोय. ऋतुजाने या फोटोसाठी कॅप्शन ही एकदम हटके दिले आहे. तुम्हाला वॉशिंग पावडर निरमा या जाहिराती मधील मुलगी आठवतेय का? आपला घेरदार पांढरा शुभ्र फ्रॉक घालून गोलगोल फिरणारी ती चिमुकली. येस. बरोबर ओळखलंत तुम्ही. ‘निरमा, वॉशिंग पावडर निरमा’ असे कॅप्शन ऋतुजाने या फोटोसाठी दिले आहे. ती म्हणते की, हा फोटो पाहिल्यानंतर दुसरे कुठलेही कॅप्शन सुचले नाही. तुम्हाला ऋतुजाचा हा फोटो कसा वाटतोय? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.

अनन्या या नाटकातील तिच्या अभिनयामुळे ऋतुजा सर्व दिग्दर्शक आणि निर्माता यांच्या नजरेत आली होती. त्यानंतर तिने ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमध्ये साकारलेली स्वानंदीची भूमिकादेखील चाहत्यांना खूपच आवडली होती. अलीकडे सुबोध भावे यांच्यासोबत ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये ऋतुजा दिसली होती.