बिग बॉस मराठी दोन मध्ये देखील अभिनेत्री किशोरी शहाणेनी पार्टिसिपेट केले होते.

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चिपळूण, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या भागामध्ये महापुराचा धोका अजूनही आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबई पुण्यामध्ये परिस्थिती थोडी बरी आहे. तिथे वातावरण आल्हाददायक आहे. एका जागी पावसाने रौद्ररूप धारण केलेले असताना दुसऱ्या जागी पाऊस अतिशय आल्हाददायी वाटतोय.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन किशोरी शहाणे यांनी एक व्हिडिओ आपल्या चाहत्यांच्या काळजीपोटी शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांना घरी राहून पावसाचा आनंद घेण्याची विनंती या व्हिडिओमधून त्या करताना दिसून येत आहेत. बाहेर जोराचा पाऊस चालू असताना स्वत:ची आणि आपल्या घरच्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी घरी राहणे तेच उत्तम आहे. असे त्या सांगत आहेत. घरी राहून चहा, गरमागरम भजी खा असेदेखील त्यांनी या व्हिडिओ मधून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

मराठी, हिंदी मधील चित्रपट आणि मालिकांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री किशोरी शहाणे एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहेतच. मोरुची मावशी, दुर्गा झाली गौरी, मी तुझ्या पाठीशी आहे, कांदेपोहे तुझ्या आणि माझ्या प्रेमाचे इत्यादी नाटकांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा टीव्ही आणि चित्रपटांकडे वळवला होता. कर्मा या सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी छोटेमोठे आणि अतिशय महत्त्वाचे रोल केले आहेत. बिग बॉस मराठी दोन मध्येदेखील त्यांनी पार्टिसिपेट केले होते.