'मोस्ट व्हर्सटाइल ऍक्टरेस ऑफ इंडियन टेलिव्हिजन २०२१' या कॅटेगरीमध्ये मयूरीला अवॉर्ड मिळाला आहे. ह्या शो मधील काही फोटोज मयुरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केले आहेत.

इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स हा एक नामांकित अवॉर्ड शो आहे. मागील सहा वर्षांपासून हा शो सुरु आहे. आणि यावर्षी कोरोनाच्या काळातही हा अवॉर्ड शो पार पाडण्यात शोच्या मेकर्सना यश आले आहे. सातव्या सीझनच्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली आहेत. मराठमोळी अभिनेत्री आणि खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिला इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स २०२१  ने सन्मानित करण्यात आले आहे. ‘मोस्ट व्हर्सटाइल ऍक्टरेस ऑफ इंडियन टेलिव्हिजन २०२१’ या कॅटेगरीमध्ये मयुरीला अवॉर्ड मिळाला आहे. ह्या शो मधील काही फोटोज मयुरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केले आहेत.

स्टार प्लसवरील इमली या मालिकेमध्ये मयुरी सध्या एक महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीला मयुरीने हा रोल करण्यास नकार कळवला होता. कारण त्याच वेळी ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात वाईट पेजमधून जात होती. पण आयुष्यातील वाईट काळातही जर आपण धीराने काम करत राहिलो तर आपल्याला होणारी वेदना कमी होतेच. त्यावेळी मयुरीने इमली या सीरियलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचेच फळ म्हणजे आज तिला या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

दु:ख आले तर आयुष्यामध्ये हताश न होता, त्या दुःखांचा धैर्याने सामना करणे, हेच आपल्या हातात असते. सतत क्रियाशील असणे, सतत काम करत राहणे सोबत आपण एक आशावादी दृष्टिकोन ठेवून आयुष्याला सकारात्मक दृष्टीने जगू शकतो. मयुरीच्या आयुष्याकडे पाहिले तर मयुरी ही खरंच एक स्ट्राँग वूमन आहे हे दिसून येते. २०१४ मध्ये आलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हीरो’ या सिनेमातून मयुरीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बऱ्याच नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले. आणि आता ती स्टार प्रवाहवरील इमली या मालिकेमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येते.