आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे 'जेठालाल'ला घ्यावा लागला हा निर्णय; पुढे झाले हे.... / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

टीव्हीवरील कॉमेडी शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो सर्वांत जास्त पाहिला जाणारा शो असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा शो आता घराघरात पोहोचला आहे. या शोबरोबरच शोमधील भूमिकाही प्रेक्षकांच्या कुटुंबातील एक होऊन गेल्या आहेत. त्यामुळे या पात्रांच्या सुखदुःखांशी प्रेक्षक एकरूप होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शोमधील ‘जेठालाल’ आर्थिक अडचणीत सापडला असून त्यासाठी आपले 12 वर्षे जुने दुकान तो विकतो. पण ते केवळ स्वप्न असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रेक्षकांना दिलासा वाटला असला तरी आता आर्थिक अडचणीतून जेठालाल कोणता मार्ग काढतो हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘तारक मेहता’ शोमध्ये अभिनेता दिलीप जोशी ‘जेठालाल’ ही खूपच लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. या शोमध्ये जेठालालचे ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ नावाचे दुकान दाखविण्यात आले आहे. पण सध्याच्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर त्याचे हे 12 वर्षे जुने दुकान विकण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जेठालाल गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून तो कर्जबाजारीही झाला आहे. त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्याने दुकान विकण्याचा निर्णय घेतला असून तो सोसायटी सोडून जाण्याचाही विचार करत आहे.

जेठालालने दुकानाबाहेर लावलेला ‘दुकान विकणे आहे’ हा बोर्ड पाहून एक व्यापारी त्याच्याकडे येतो. तो दुकान 50 लाखांत विकत घेण्याची तयारी दाखवतो. व्यवहार पक्का झाल्यावर व्यापारी दुकानाची चावी घेण्यासाठी जेठालालकडे येतो. त्यावेळी तो त्याच्या दुकानावरील ‘गडा इलेक्ट्रिकल्स’ नावाचा बोर्ड काढून त्याजागी ‘जगतराम इलेक्ट्रॉनिक्स’चा बोर्ड लावण्याबाबत सांगतो. त्यावेळी नट्टू काका व्यापाऱ्याला दुकानाची चावी देण्यास नकार देतात, काऱण त्यांना दुकान विकले जाऊ नये असे वाटत असते. त्यानंतर चावीसाठी ओढाओढी सुरू होते आणि अचानक जेठालाल झोपेतून जागा होतो. दुकान विकण्याबाबतचे ते केवळ एक स्वप्न होते, याचा उलगडा पुढील एपिसोडमध्ये प्रेक्षकांना होतो. आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्याला तसे स्वप्न पडलेले असते.

अर्थात आपल्या या अडचणीवर जेठालाल आता कोणता मार्ग काढतो, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण सध्या जेठालालला अडचणीत सापडलेला पाहून प्रेक्षकही अस्वस्थ झाले आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah jethalal shop is about to sale