शोक फळदेसाई आणि विदुला चौघुले हे दोघेजण 'आमचा गणराया' या व्हिडिओ अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत.

लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळेच जण आतुरतेने वाट पाहात असतात. मोदक, मिठाई, बर्फी, फटाके अशा कितीतरी गोष्टींनी गणेशोत्सव आपल्याला आनंद देत असतो. गणपतीमध्ये स्पीकरवर गणपतीची गाणी ऐकणे ही प्रथा आता जवळपास रुढ झालेलीच आहे असे दिसते. दरवर्षी गणपतीच्या काळात बरीच गाणी येतात. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी असोत किंवा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत वाजवण्यासाठी असोत, या दिवसांत बरीच गणपतीची गाणी प्रसिद्ध होतात.

तर जीव झाला येडापिसा फेम अशोक फळदेसाई आणि विदुला चौघुले पुन्हा एकत्र दिसणार आहेत. काय म्हणताय? सीरियल पुन्हा चालू होतीये की काय? नाही. असं अजिबात नाहीये. पण हे दोघेजण ‘आमचा गणराया’ या व्हिडिओ अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत. अशोकने नुकताच याची ऑफिशियली घोषणा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे केली आहे. अशोक आणि विदुला यांची ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका प्रचंड हिट ठरली होती. या मालिकेने बरेच दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन केले हाेते. पण मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बऱ्याच मालिका बंद पडल्या होत्या. त्याचाच फटका या मालिकेला देखील बसला. आणि ही मालिका बंद करावी लागली  होती.

आधी एकमेकांसोबतचे वैरी, ह्या वैरातून झालेले लग्न आणि लग्नानंतर दोघांमध्ये निर्माण झालेले प्रेम यावर आधारित ही मालिका होती. या मालिकेला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. या मालिकेनंतर विदुला आणि शिवा नक्की करतात काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आणि याचमुळे या दोघांनी पुन्हा एकत्र येऊन एक प्रोजेक्ट हाती घेण्याचे ठरवले होते. आमचा गणराया ह्या व्हिडिओ अल्बमचे निर्माते कमल जैन असून दिग्दर्शक विकास पाटील हे आहेत. तर हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरे वावरे या दोघांच्या आवाजामध्ये हे गाणे रेकॉर्ड केले जाणार आहे. माणिक विंग्स म्युझिक या प्रोडक्शन हाउस मार्फत या व्हिडिओ साँगचे प्रॉडक्शन केले जात आहे.