ईदच्या शुभमुहूर्तावर बिग बॉस सीझन १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी घोषणा वूटच्या ऑफीशियल इन्स्टाग्राम पेजवरून करण्यात आली होती.

ईदच्या शुभमुहूर्तावर बिग बॉस सीझन १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, अशी घोषणा वूटच्या ऑफीशियल इन्स्टाग्राम पेजवरून करण्यात आली होती. सोबत बिग बॉसचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला होता. बऱ्याच वर्षांपासून सलमान खान या शोचा होस्ट म्हणून काम करत आहे. सिजन १५ च्या ट्रेलर मध्ये सलमान खान देखील दिसून आला होता. ८ ऑगस्टपासून बिग बॉस १५ वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

पण या सर्व चर्चांमध्ये सलमान खान व्यतिरिक्त काही भागांसाठी हा शो कोण होस्ट करणार? हा प्रश्न मात्र मागे राहिला होता. तर गॉसिप किंग आणि ‘कॉफी विथ करण’ फेम करण जोहर हा शो होस्ट करणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. करण जोहरला बिग बॉस या शोचा फॉरमॅट खूप आवडतो. त्याचप्रमाणे बिग बॉस आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्यामुळे तरुणवर्ग ह्या शो कडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शोच्या निर्मात्यांना एक नवीन चेहरा होस्ट म्हणून हवा होता. आणि त्यांचा शोध करण जोहरवर येऊन थांबला आहे.

नच बलिये, इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार, इंडियाज गॉट टॅलेंट अशा मोठमोठ्या शो मध्ये जज म्हणून काम पाहिलेला करण जोहर सध्या रॉकी और राणी की प्रेम कहाणी या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत बनणाऱ्या सिनेमामुळे चर्चेत आला होता. बिग बॉसमध्ये कोण कोण सेलिब्रेटी पार्टिसिपेट करतील? यावर अजूनही ऑफिशीयल घोषणा झाली नसली तरी दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित या शोमध्ये शंभर टक्के असणार अशी चर्चा सर्वत्र आहे.