नुकताच कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला. यात कुशल आणि भाऊ सीन संपल्यावर मास्क घालताना दिसून येत आहेत. (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

गेल्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर कलाकार आपलं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण सुरू होऊन दहा दिवस लोटले. गेले तीन महिने ओसाड पडलेल्या सेट्सवर आता पुन्हा लगबग दिसू लागलीये. आजपासून मालिकांचे नवेकोरे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी सुद्धा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी कोरोनाच्या संकटाचा विचार करत, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरणाचा श्रीगणेशा केला.

दररोज, अभिनेत्यांचे आणि क्रू मेंबर्सचे थर्मल चेक केले जात आहे. तर चित्रीकरण नसताना कलाकार मास्क आणि ग्लोव्ह्जचा वापर करून स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत.

नुकताच कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला. यात कुशल आणि भाऊ सीन संपल्यावर मास्क घालताना दिसून येत आहेत. कुशलने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हल्ली आम्ही कामा व्यतिरिक्त एकमेकांची तोंड बघत नाही (मास्कचा प्रभाव).

कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी थुकरटवाडीतील कलाकार योग्य ती काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रेया बुगडेनेही एक फोटो शेअर केला होता. यात तिचे मेकअपमेन पीपीई किट घालून तिचा मेकअप करताना दिसत आहेत.

कलाकारांना यासर्व छोट्या छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे सुरुवातीला थोडे अवघड गेले होते परंतु हळूहळू त्यांना याची सवय होताना दिसत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *