माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिजीतने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. याआधी तो 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

पावसाळा आला, कोरोना गेला यामुळे आता बाहेर फिरायला जायला काही हरकत नाही. त्यात बऱ्याच लोकांनी लसीचे दोन्ही डोस देखील घेतले आहेत. बराच मोठा लॉकडाऊन लोकांनी सहन केलाय. त्यामुळे बाहेर फिरायला जाणे हा पर्याय आता एक उत्तम ब्रेक म्हणता येईल. आपले मराठी सेलिब्रेटीदेखील बऱ्याच ठिकाणी फिरायला जाताना दिसून येत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर देखील आपल्या बायकोसोबत सध्या लेह लडाखला फिरायला गेला आहे. लेह लडाखच्या ट्रिपमधून बरेच अपडेट्स त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बुलेट राइड असो किंवा निसर्गरम्य ठिकाणांचे फोटोज असोत, सर्व अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत त्याने शेअर केले आहेत. अभिजीत आणि अभिजितच्या फॅमिलीसोबतचे हे फोटोज पाहिले तर नक्कीच लेह लडाखला जाणं सध्या एक उत्तम ऑप्शन आहे असे दिसतेय.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिजीतने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. याआधी तो ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पण एका मोठ्या काळासाठी, सतत प्रसिद्धीच्या झोतात राहाणे हे त्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे शक्य झाले होते. या मालिकेतील चीटर, खराब नवऱ्याची भूमिका त्याने अतिशय उत्कृष्टरित्या निभावली होती.  मालिकांप्रमाणेच अभिजीतने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मामाच्या गावाला जाऊया, ढोल ताशे, बाबा, शौर्य, एक दुसरे के लीये, मी पण सचिन, भय,ध्यानीमनी, त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र अशा अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला होता.