एक सर्वसामान्य गृहिणी ते वर्किंग वुमन आणि नंतर इतक्या मोठ्या बिझनेसची मालकीन हा राधिकाचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वसामान्य स्त्रीयांसाठी अतिशय प्रेरणादायी प्रवास होता.

३०० कोटी रुपयांच्या ‘राधिका मसाले’ या कंपनीची मालकीण राधिका गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अनिता दाते केळकर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचली. राधिका या भूमिकेने अनिताला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवले. अनिता मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील मालिकांमध्ये काम करताना दिसून येते.

अनिताने नुकताच इंस्टाग्रामवर साडीतील एक फोटो शेअर केला आहे. आणि ही साडी खूप स्पेशल साडी आहे. कारण  ही साडी ‘इको तत्त्व’ नावाच्या कंपनीने बनवली आहे. विदर्भातील चाळीस ते पन्नास शेतकर्यांना ऑरगॅनिक बियाणे देऊन कापूस उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर जवळपास दोनशे महिला आपल्या चरख्याच्या साहाय्याने या साड्या बनवतात ते ही कोणत्याही इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता. ह्या हँडलूम साडय़ा निश्चितच पर्यावरणपूरक आहेत. त्यामुळे अनितासाठी ही साडी खूपच स्पेशल आहे. या साडीमध्ये अनिता खूपच सुंदर दिसत आहे. चाहतेदेखील तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करून आपल्या प्रेमाचा वर्षाव नेहमीप्रमाणेच करत आहेत.

एक सर्वसामान्य गृहिणी ते वर्किंग वुमन आणि नंतर इतक्या मोठ्या बिझनेसची मालकीण हा राधिकाचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वसामान्य स्त्रियांसाठी अतिशय प्रेरणादायी प्रवास होता. त्यामुळे राधिका सुभेदार या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. या मालिकेतील नंतर राधिका चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये दिसून आली होती.