छोट्या पडद्यावरील अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या आधी तो थिएटरमध्ये काम करायचा. जागो मोहन प्यारे, लाली लीला अशा बऱ्याच नाटकांमध्ये त्याने काम केले होते.

हसताय ना? हसायलाच पाहिजे…असे म्हणणारे डॉ. नीलेश साबळे असो किंवा कुशल बद्रिके किंवा भाऊ कदम किंवा श्रेया बुगडे किंवा सागर कारंडे. चला हवा येऊ द्यामधील प्रत्येक कलाकार महाराष्ट्रातील लोकांचे आवडते कलाकार आहेत. बऱ्याच लोकांच्या कोरड्या आयुष्यामध्ये हा शो हास्याचा झरा घेऊन येणारा एक सुपर डूपर हिट शो आहे.

कुशल बद्रिके याचा आज वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरील अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या आधी तो थिएटरमध्ये काम करायचा. जागो मोहन प्यारे, लाली लीला अशा बऱ्याच नाटकांमध्ये त्याने काम केले होते. फू बाई फू या झी मराठी वरील कॉमेडी शोमध्ये देखील त्याने पार्टिसिपेट केले होते. अशा बऱ्याच मोठ्या संघर्षानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’ मुळे यशाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे.

श्रेया बुगडेने अगदी हटके स्टाईलमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ती म्हणते की,’ दरवेळी मी बोलत राहते आणि तू ऐकत राहतो यांच्यामुळेच आपली मैत्री अजूनही टिकून आहे. नेहमी संकटाच्या प्रसंगी वेळोवेळी तू माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला आहेस. आज एकादशी निमित्त तुझा वाढदिवस असणे हा एक निव्वळ योगायोग त्यामुळे अजिबातच नाहीये. तुझं आमच्या आयुष्यात असणं ही कदाचित पांडुरंगाची कृपा असावी. आज तुला जसं आयुष्य हवं आहे तसं तुला लाभो आणि त्याची आणि तुझी सोबत मला कायम मिळो हीच त्या विठ्ठलचरणी प्रार्थना. बाकी तुला खूप प्रेम. हॅपी बर्थडे टू माय नंबर वन.’ असे म्हणत श्रेयाने कुशल बद्रिके ला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिलेल्या आहेत.

जत्रा, हुप्पा हुय्या, माझा नवरा तुझी बायको, भाऊचा धक्का, अशा बऱ्याच सिनेमांमध्ये कुशल बद्रिकेने काम केलेले आहे.