. 'बुलेट चालवतानाचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि आपल्या सहकलाकाराचा चेहरा झाकण्याचा आनंद' असे विनोदी कॅप्शन देत तिने हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

इन्स्पेक्टर संजीवनी रणजीत ढाले पाटील सध्या कलर्स मराठीवर गाजत आहेत. एका साध्या सुध्या मुलीपासून इन्स्पेक्टर बनण्यापर्यंत संजीवनीचा प्रवाह खूपच थक्क करणारा मालिकेमध्ये दाखवण्यात आला आहे. बडबडी, अल्लड संजीवनी ते एक जबाबदार, कर्तृत्ववान पोलीस इन्स्पेक्टर हा संजीवनीचा प्रवास प्रेक्षकांना खूपच आवडतोय.

संजीवनी म्हणजेच शिवाजी सोनार इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. शूटिंग लोकेशन वरून तसेच बऱ्याच ब्रॅण्डसाठी केलेले फोटोशूट असे बरेच फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मालिकेमध्ये जरी साधीसुधी संजीवनी दाखवली असली तरी खऱ्या आयुष्यामध्ये मात्र संजीवनी खूप आधुनिक आणि बोल्ड लूक मध्ये दिसून येते.

अशा या हुशार अभिनेत्रीने नुकताच शूटिंग लोकेशन वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती मनीराज पवार ज्यांने राजा राणीची जोडी मध्ये रणजीत ढाले पाटील यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत बुलेटवरून फिरताना दिसून येतेय. या फोटोमध्ये शिवानी आणि मानिराज हसत खेळत गाडीवरून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. ‘बुलेट चालवतानाचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि आपल्या सहकलाकाराचा चेहरा झाकण्याचा आनंद’ असे विनोदी कॅप्शन देत तिने हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मणिराज पवारला टॅग करून ‘तुला काय वाटते?’ हा विनोदी प्रश्न तिने आपल्या कॅप्शनमधून मनीराजला विचारला आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सिनेमामध्ये तिने एक छोटी भूमिका साकारून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे तिने बऱ्याच नाटकांमध्ये देखील या आधी काम केले होते. पण तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले ते राजा राणीची जोडी यामधील संजीवनी रणजीत ढाले पाटील या भूमिकेमुळे. तुमच्या सर्वांची लाडकी संजीवनीचे तुम्ही हे बोल्ड अँड ब्युटिफुल फोटोज पाहिले आहेत का?