सर्वात हटके पद्धतीने रक्षाबंधनाच्या सणाचे अपडेट्स कोणी दिले असतील तर ती म्हणजे रसिका सुनील होय.

नुकतेच रक्षाबंधन पार पडले. बऱ्याच सेलिब्रिटींनी आपल्या भावांसोबतचे बरेच फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. आणि रक्षाबंधनाचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्व कलाकार अगदी जोशात, आनंदात सण साजरा करताना दिसून आले. पण सर्वात हटके पद्धतीने रक्षाबंधनाच्या सणाचे अपडेट्स कोणी दिले असतील तर ती म्हणजे रसिका सुनील होय.

करण जोहरच्या दोस्ताना सिनेमातील ‘जाने क्यू’ या गाण्यावर तिने एक रील शेअर केला आहे. यामध्ये ति आपल्या फॅमिलीसोबत आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत खूप धमाल करताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ती आणि तिची आई फुगडी देखील खेळत आहेत. आणि विशेष बाब म्हणजे तिच्या डॉगीसोबत सर्वजण डान्स करताना दिसून आले. उत्साह, जल्लोष आणि एनर्जीने भरलेला हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे.

https://www.instagram.com/reel/CS5yp5ZCtYh/?utm_source=ig_web_copy_link

रसिका सध्या आपला बॉयफ्रेंड आदित्य सोबतच्या नात्यामुळे चर्चेत असते. आदित्य आणि रसिका आपले बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्याचप्रमाणे अनेक डान्स रील देखील दोघे शेअर करत असतात. आदित्य युएसमध्ये राहणारा एक इंजिनीयर असला तरी पॅशन म्हणून तो डान्स आणि कोरियोग्राफीचे काम करतो. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा आहे. पण काहीही असले तरी आदित्य आणि रसिका एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसतात. आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर कपल म्हणून या दोघांना पाहिले जाते.