'टामोरा डीजी वर्ल्ड' या आपल्या कंपनीच्या मार्फत त्याने स्वत:चे एक ओटीटी प्लॅटफॉर्म क्रिएट केले आहे.

महाराष्ट्र आणि चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांचे एक घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे. तुम्ही कितीही दु:खात असाल, तुमचा मूड कितीही खराब असेल तर चला हवा येऊ द्या हा शो पाहिला तर तुमचा मूड नक्कीच चांगला होईल. हास्य, विनोदी पंच आणि वेडेपणाने भरलेला हा शो महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पाहिला जातो. अनेक मोठमोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आपल्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या तसेच नाटकांच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येतात. त्यामुळे अधूनमधून आपल्या आवडत्या कलाकारांचे दर्शन प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकेमध्ये होतेच. त्यामुळे देखीप हा शो प्रत्येकाच्या आवडीचा ठरला आहे.

समांतरफेम अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रेया बुगडे सोबत चला हवा येऊ द्या च्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही हास्यविनोद करताना दिसून येत आहेत. ‘सौ आणि श्री जोशीबुवा’ असे कॅप्शन देत त्याने हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

श्रेया बुगडे आणि स्वप्नील जोशी या शोमध्ये जोडीने कोणतातरी विनोदी स्किट प्ले करणार आहेत असे या पोस्टवरून दिसून येते. बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर स्वप्नील एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटण्यासाठी येणार आहे. ‘टामोरा डीजी वर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या मार्फत त्याने स्वत:चे एक ओटीटी प्लॅटफॉर्म क्रिएट केले आहे. आपला मित्र नरेंद्र फिरोदिया याच्यासोबत मिळून त्याने हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. आता या ओटीटी प्लॅटफॉर्म मार्फत कोणत्या मालिका, सीरियल आणि कोणत्या प्रकारचा कंटेंट घेऊन स्वप्नील येतोय हे पाहणे खूपच उत्साहाचे असेल.