Shreya Bugde Instagram: श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरांमध्ये माहिती आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली आणि सर्वांची लाडकी झाली.

श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरांमध्ये माहिती आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली आणि सर्वांची लाडकी झाली. हसताय ना हसायलाच पाहिजे असे म्हणणारे डॉ. नीलेश साबळे आणि चला हवा येऊ द्या मधील एकूण एक कलाकार महाराष्ट्रातील लोकांचे लाडके आहेत. श्रेया बुगडे ही अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत होती. पण तिला लोकप्रियता मिळाली ती चला चला हवा येऊ द्यामुळे. श्रेया निखिल सेठ यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. इन्स्टाग्रामद्वारे ती आपले घरातील फोटो, तसेच सेटवरील फोटो दरवेळी अपलोड करून आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहते.

लॉकडाउन असल्यामुळे आता बऱ्याच चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. तरी देखील बरेच कलाकार आपल्या घरातून नवीन नवीन व्हिडिओ किंवा फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहणे पसंत करतात. श्रेया देखील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बरीच सक्रिय असते.

नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने पांढरा कुर्ता परिधान केला आहे. हातात कॉफीचा कप घेऊन ती एका वृक्षांसोबत बोलतीये, असा तो फोटो आहे. ह्या फोटोसाठी तिने कॅप्शनही अगदीच कलाकारी लिहिलं आहे. ‘कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका सजीव वाटणाऱ्या संभाषणात मग्न.’  ह्या कॅप्शन सोबत तिने ती राहत असलेल्या सोसायटीच्या लसीकरण कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक देखील केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी लस घेतल्यानंतर आपले फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण श्रेयाने आपल्या लसीकरण पोस्टसाठी वापरलेले कॅप्शन अगदीच हटके आहे. हो ना?