फोटो गुगलवरून साभार

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा अभुतपुर्व असा विवाह सोहळा पार पडला. 24 जानेवारी 2019 मध्ये मिताली – सिद्धार्थचा साखरपुडा झाला होता. यंदा त्याच तारखेला हे दोघे विवाहबंधनात अडकलेत. 
या दरम्यान त्यांनी आठवणींचा मोठा खजिना जमवला आहे. आपल्या फॅन्सना सोशल मीडियाद्वारे आपल्या दैनंदीन अॅक्टीव्हीटी शेअर करून हे जोडपं एकमेंकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करत असतात. त्यांचं आऊटींग, तेथील फोटो हे नेहमीच चाहत्यांसाठी आकर्षण राहिले आहे.  सोशल मीडियाद्वारे या जोडप्याने सर्वांचे प्रेम मिळवले आहे. साखरपुड्यापासून गेले दोन वर्ष मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची त्यांचे चाहते वाट पाहत होते अखेर 24 जानेवारी 2021 रोजी हे रॉयल जोडपं विवाहबद्ध झालं. त्यांच्या लग्नाला अनेक नामांकित सेलिब्रेटी तसेच त्यांच्या मित्रांनी हजेरी लावली होती. त्यानंतर नुकतंच हे जोडपं हनिमूनसाठी लोनावळा येथे गेलं आहे. तेथील काही खास क्षण या जोडप्याने त्यांच्या इन्स्टावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 

सकाळी पती सिद्धार्थबरोबर मिताली पर्वतीय दृश्याचा आनंद लुटतानााचा सुंदर फोटो तिने इन्स्टावर शेअर केला आहे. सदैव आनंदी…असे कॅप्शन देत मितालीने दोघांचा हा रोमॅन्टीक फोटो शेअर करून तिने सिद्धार्थवरचे प्रेम चाहत्यांसमोर व्यक्त केले आहे. तिच्या कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे हे सुंदर जोडपे कायम आनंदात राहू शकेल. हे मनमोहक चित्र पाहिल्यानंतर चाहत्यांनी मिताली आणि सिद्धार्थ यांना भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 
मितालीने लग्न समारंभाचेही नाजूक, हळवे क्षण सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले होते. ‘सौभाग्याची मंगलघटिका’ असे कॅप्शन देऊन लग्नातील हळवे क्षण मितालीने फेसबूकवर शेअर केले होते.

दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थने सध्या लग्नासाठीचा ब्रेक घेतला असला तरी मिताली तिच्या चालू असलेली टीव्ही मालिका ‘लाडाची मी लेक गंं’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे तर, सिद्धार्थ आपल्या स्टारमराठीवर नवीनच सुरू झालेली मराठी टीव्ही मालिका ‘तू आहेस का’ यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.