सोनाली खरे तिच्या मुलीसोबत (फोटो - सोशल मीडियावरून साभार)

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांच्या संपर्कात असते. याद्वारे ती तिचे फोटो, लेटेस्ट अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच सोनालीने तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला (Sonali Khare Shared Video With Her Daughter) आहे. यामध्ये सोनाली आणि तिच्या मुलीचा साडीतील स्वॅग दिसून येत आहे. मायलेकीचा हा अंदाज चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत आहे.

सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सोनाली ग्रीन कलरची साडी तर तिची मुलगी सनाया क्रिम कलरची साडी नेसलेली दिसत आहे. या व्हिडिओत मागे ‘नवलाई माझी लाडाची गं’ हे गाणंही वाजत आहे. त्यावर सोनाली आणि तिची मुलगी गोल फिरकी घेत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून दोघीही फारच सुंदर दिसत आहेत. मायलेकीचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर कमेंटद्वारे ते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

सोनालीने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. २०१४ साली ‘बे दुणे दहा’ या मालिकेत दिसली होती. त्यानंतर ती ‘७ रोशन व्हिला’, ‘ह्रदयांतर’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ या कुकिंग शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. लॉकडाऊननंतर या शोद्वारे तिने दसऱ्याच्या मुहुर्तावर छोट्या पडद्यावर पुनरागमन केली आहे. सोनालीने अभिनेता बिजय आनंदसोबत लग्न केला आहे. ‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांची भेट झाली होती. यादरम्यान त्या दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.