कलर्स मराठीवरील शांतनू आणि शर्वरी म्हणजेच सुयश टिळक आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका शुभमंगल ऑनलाईन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

ऑफिसमध्ये मिळालेल्या फावल्या वेळात टाइमपास करत नाही, असा क्वचितच कोणीतरी पाहायला मिळेल. सलग आठ आठ तास काम करणे तसं पाहायला गेलं तर कोणालाच शक्य नसते. म्हणून सगळेच जण कधी वेळ मिळतो आणि कधी थोडा मोबाईलमध्ये किंवा इतर कोणताही टाईमपास करतो याची वाट पाहात असतात. पण मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगच्या वेळापत्रकाची गोष्ट जरा वेगळी असते. इथे सीन रेडी व्हायला बराच वेळ लागतो. कारण कोणा एका माणसावर हे काम अवलंबून नसते.

सुकन्या मोने इन्स्टाग्रामवर बऱ्याच सक्रिय असतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सायली संजीव म्हणजेच तुमची लाडकी शर्वरी त्यांची वेणी घालताना दिसून येत आहे. ‘सकाळी सातचे शूटिंगचे असून आठ वाजेपर्यंतदेखील कोणताही सीन रेडी होत नाही. तर मिळालेल्या फावल्या वेळेत काय करायचं? हा प्रश्न जेव्हा कलाकारांना पडतो तेव्हा आम्ही असा गंभीर टाईमपास करतो.’ असे सुकन्या मोने यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमधून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

कलर्स मराठीवरील शांतनू आणि शर्वरी म्हणजेच सुयश टिळक आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका शुभमंगल ऑनलाईन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शांतनू आणि शर्वरी एकमेकांना ऑनलाईन भेटतात आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेम ते लग्न या प्रवासात मध्ये आलेले लॉकडाऊन हा प्रवास शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये दाखवला आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ज्वर थोडा कमी होत असताना सर्व मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये सुकन्या मोने यांनी सुयश टिळकच्या आईचा रोल प्ले केला आहे. घाडगे अँड सून या मालिकेच्या प्रचंड यशानंतर सुकन्या मोने शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येत आहेत.