नायिका अक्षया नाईक याचे व्हिडिओ आणि रील्स नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

अभिनेत्री म्हटलं की परफेक्ट फिगर, परफेक्ट हेअर, परफेक्ट स्किन, परफेक्ट मेकअप, परफेक्ट ड्रेस अशी एक आपली साधारण कल्पना झाली आहे. पण या सर्व कल्पनांना सोडून  प्रत्येक स्त्री जशी आहे तशी सुंदरच असते. ही भावना प्रेक्षकांमध्ये रुजू करणे आणि स्त्री सशक्तीकरणाला मनोरंजनाच्या माध्यमातून काहीसा हातभार लावणे हाच सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सुरू करण्यामागचा हेतू होता.

कधी? कुठे? कशाप्रकारे? कोणाला प्रेम भेटेल काही सांगता येत नाही. लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा पण लग्नात आणि प्रेमात ‘प्रेम’ असणं खूप महत्त्वाचं असतं. अशाच एका आगळ्या वेगळ्या प्रेमाची कथा सांगणारी एक मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेची निर्माती आहे. या मालिकेच्या सेटवर बऱयाच गमतीशीर ऍक्टिव्हिटीज होत असतात. नायिका अक्षया नाईक याचे व्हिडिओ आणि रील्स नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये या मालिकेचा हीरो  म्हणजेच समीर परांजपे मध्ये आहे. एका बाजूने अक्षय त्याला ओढतेय तर दुसरीकडून तिघी जणी त्याला ओढताना दिसून येत आहेत. ‘कशी भेटणार या राजाला त्याची राणी? हा तर गोपियो मै कन्हैया बनलाय.’ असे विनोदी कॅप्शन देत तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रसिद्ध गुजराती मालिकेचा मराठी रिमेक आहे. त्याचप्रमाणे आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असणारा सिनेमा ‘दम लगा के हैशा’ या सिनेमाची थीम आणि या मालिकेचे थिम हे जवळपास सारखीच आहे. काहीश्या हटक्या विषयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.