नुकताच तेजश्रीने आपल्या मैत्रिणीसोबत टेक प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाउस चालू केले आहे.

आजकालच्या डिजीटल युगामध्ये फोटो काढणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सेल्फी घेणे, फोटो काढणे, जाणूनबुजून कँडिड फोटो काढणे, रील बनवणे हे सर्व आजकाल लहान मुलांनादेखील येतं. पण आपली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला मात्र फोटो काढायला अजिबात आवडत नाही. का पण? कारण ती खूपच शाय मुलगी आहे, असं तिला वाटतं. आपल्या इन्स्टाग्राम  अकाऊंटवर तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय चिल मूडमध्ये दिसते आहे. या फोटोंना कॅप्शन देताना तिने म्हटले आहे की,’मला फोटो काढायला अजिबात आवडत नाही. कारण मी खूपच लाजाळू मुलगी आहे. प्लीज माझे फोटो काढू नका.’ असे  मजेशीर कॅप्शन देत तिने आपले हे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

नुकतेच तेजश्रीने आपल्या मैत्रिणीसोबत टेक प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस चालू केले आहे. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत नवीन प्रोजेक्ट देखील सुरू झाले आहेत. आणि तेजश्री सध्या याच प्रोजेक्ट्सच्या  शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कोरोनामुळे सध्या चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी ‘नाट्यमंच’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बरीच नाटके प्रदर्शित केली जात आहेत. तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांची प्रमुख भूमिका असणार ‘साटंलोटं’ हे नाटकदेखील याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले हे नाटक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केले आहे. अग्गंबाई सासूबाई या मालिकेनंतर तेजश्री आणि आशुतोष पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे शुभ्रा आणि बबन्याच्या चाहत्यांना हे नाटक एक सुवर्णसंधीच आहे.