Tarak Mehta ka ooltah chashmah’s madhvi Bhabhi: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये साधी दिसणाऱ्या सोनालिका खऱ्या आयुष्यामध्ये मात्र प्रचंड ग्लॅमरस आहेत.

तारक मेहता का उलटा चष्मा हा सोनी सब टीव्हीवरील बराच प्रसिद्ध शो आहे. हा शो जवळपास १३ वर्षांपासून टीव्हीवर सुरू आहे. माधवी भाभी हे पात्र साकारणाऱ्या सोनालिका जोशी ह्यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये त्या पापड आणि लोणची विकण्याचा बिझनेस करत असतात. पण तुम्हाला माहितीये का की खऱ्या आयुष्यात देखील माधवी भाभी या खऱ्याखुऱ्या बिझनेस वुमन आहेत.

सोनालीका यांनी कोलकातामधील मिरिंडा हायस्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई गाठली. तिथेच त्यांनी इतिहासामध्ये बीए ही पदवी मिळवली. त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग आणि थिएटर अशा दुहेरी पदव्या त्यांच्याकडे आहेत.

५ जून १९७६ रोजी त्यांचा जन्म झाला. गेल्या तेरा वर्षांपासून त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये माधवी भाभीचा रोल साकारत आहेत. सीरियलमध्ये जरी त्यांचा लोणचं आणि पापड बनवण्याचा बिझनेस असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचा फॅशन डिझायनिंग ह्या क्षेत्रा संबंधित एक बिझनेस आहे. ज्यातून त्या कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. त्यांच्याकडे खूप महागड्या गाड्या देखील आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये काम करण्यासाठी दिवसाला त्या पंचवीस हजार रुपये इतके मानधन घेतात, असे सूत्रांच्या माहितीवरून कळते. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये साधी दिसणाऱ्या सोनालिका खऱ्या आयुष्यामध्ये मात्र प्रचंड ग्लॅमरस आहेत. इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी आपले बरेच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. मराठी थिएटरपासून सुरू केलेला त्यांच्या प्रवासात तारक मेहता का उलटा चष्मामुळे त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.