'तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होणार आहे ज्याच्यामुळे सगळं सकारात्मक दृष्टीने बदलून जाईल.' असा संदेश तिने या फोटोच्या कॅप्शनमधून आपल्या चाहत्यांना दिला होता.

जान्हवी आणि शुभ्रा म्हणजे तुमची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्री इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने लाल रंगाच्या साडीमधील आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि डॅझलिंग दिसत आहे. आपले स्वत:चे प्रोडक्शन हाउस सुरु केल्यानंतर, तिने लव्ह रश या सिनेमाची घोषणा देखील केली आहे. तेजश्री सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. असे असले तरी सुद्धा आपले सुंदर सुंदर फोटो ती नेहमीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यास अजिबात विसरत नाही.

तेजस्वीचा हा लाल साडीतील फोटो काही क्षणांच्या अवधीतच प्रचंड व्हायरल झालेला दिसून येतोय. आपले सुंदर फोटो शेअर करताना तेजश्री नेहमीच काहीतरी पॉझिटिव्ह संदेश आपल्या चाहत्यांना देत असते. मागे तिने रेड टॉप आणि ब्लू जीन्समधला एक अतिशय सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. ‘तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होणार आहे ज्याच्यामुळे सगळं सकारात्मक दृष्टीने बदलून जाईल.’ असा संदेश तिने या फोटोच्या कॅप्शनमधून आपल्या चाहत्यांना दिला होता.

अग्गंबाई सासूबाई मधील शुभ्रा ही भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती. याआधी आलेल्या होणार सून मी या घरची या मालिकेमुळे ती महाराष्ट्राची लाडकी सून तर बनली होती. या दोन्ही मालिकांमुळे महाराष्ट्रातील सर्वात गुणी सून म्हणून जान्हवीकडे नेहमीच पाहिले जाते. असे असले तरी सुद्धा तिने चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे.