पुण्यातील  एका ऑर्गनायझेशन सोबती ट्रेकिंग लिडर म्हणून देखील काम करत होती.

तुला पाहते रे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच तुमची लाडकी ईशा निमकर इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. नुकताच इन्स्टाग्रामवर तिने एक रील शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशा अतिशय सुंदर दिसत आहे. हा रील शेअर करून तिने आपल्या चाहत्यांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा देखील दिल्या आहेत. गायत्री तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जाते त्याचप्रमाणे ती ओळखली जाते ती तिच्या खदखदून आणि नॉन स्टॉप हसण्यामुळे. माणसांनी सतत हसतमुख असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरील हास्याने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. पण गायत्रीचे खदखदून आणि नॉन स्टॉप हसण्याने दुसऱ्यांना देखील खदखदून हसायला भाग पाडलं जातं. जेव्हा जेव्हा गायत्री चला हवा येऊ द्याच्या मंचावर आली आहे तेव्हा तेव्हा श्रेया बुगडे आणि भाऊ कदम या सर्वांनी तिच्या हसण्यावरून बरेच लाडीक विनोद देखील केले होते.

तुला पाहते रे या मालिकेनंतर गायत्री नक्की काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असणार. तर गायत्री अनेक ब्रॅण्ड्सच्या फोटोशूटमध्ये व्यग्र असते. ती इन्स्टाग्रामवर बरेच रील बनून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तुला पाहते रे मध्ये साधीसुधी संस्कारी मुलगी असणारी ईशा खऱ्या आयुष्यात मात्र एकदमच धाडसी आहे. तिने रॉक क्लायम्बिंग, रेस्क्यू ऑपरेशन यामध्ये ऑफिशियल एका महिन्याचे ट्रेनिंग मनाली येथून घेतले आहे. पुण्यातील एका ऑर्गनायझेशन सोबती ट्रेकिंग लिडर म्हणून देखील काम करत होती. २०१६ मध्ये आलेल्या इन्टॉलरन्स या शॉर्टफिल्म द्वारे तिने आपले अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. हिंसेची दुसरी बाजू जी खूपच क्रूर आहे हे दाखवणारी ही शॉर्टफिल्म प्रचंड प्रसिद्ध झाली होती. आणि त्यानंतरच तिला तुला पाहते रे या मालिकेमध्ये सुबोध भावे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. आपल्या पदार्पणाच्या सीरियल मध्येच इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणे यासाठी देखील नशीब लागते. आणि गायत्री दातार खूपच नशीबवान आहे.