एका १० वर्षाच्या मुलाने आपले पहिले स्केच अभिनेता अक्षयकुमारचे काढले आणि त्याच्या आईने ते सोशल मीडियावर शेअरही केले.

एका १० वर्षाच्या मुलाने आपले पहिले स्केच अभिनेता अक्षयकुमारचे काढले आणि त्याच्या आईने ते सोशल मीडियावर शेअरही केले. अक्षयची नजर जेव्हा या स्केचवर पडली तेव्हा त्यानेही आपल्या या स्केचवर रिऍक्शनही दिली.

 

हे स्केच त्या मुलाच्या आईने टि्वटरवर अक्षयकुमारला टॅग करुन शेअर केले आणि म्हटले, माझा १० वर्षाचा मुलगा आदित्य शर्माचे हे पहिले स्केच आहे आणि त्याला अपेक्षा आहे की तुम्हालाही ते पसंत पडेल. मला माहीत आहे ती, हे अचूक नाही, पण त्याने जेवढं शक्य आहे, तेवढं तंतोतंत करण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे की, हे तुम्ही पाहाल आणि शक्य असेल तर रिप्लाय करा. धन्यवाद.

त्यानंतर अक्षयची नजर त्यावर पडली आणि त्याने लगेच त्यावर प्रतिक्रियाही दिली. अक्षयने म्हटले की, खूप चांगलं वाटलं. कृपया आदित्यला माझ्यावतीने धन्यवाद सांगा. मला खूप चांगलं वाटतंय की त्याने आपल्या पहिल्या स्केचसाठी मला निवडलं. त्याच्यासाठी प्रेम आणि प्रार्थना सदैव.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *