फिरकीपटू हरभजनसिंगनी त्याच्या ‘फ्रेंडशीप’ या पहिल्यावहिल्या तमिळ चित्रपटाचं मोशन पिक्चर त्यानी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केलं आहे.

भारतीय फिरकीपटू हरभजनसिंग आपल्या सडेतोड वक्तव्यांबाबत प्रसिद्ध आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवणाऱ्या हरभजनला सगळेच लाडाने ‘भज्जी’  म्हणून ओळखतात.

 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो पण या वर्षी कोरोनामुळे तो आयपीएलमध्येही खेळतान दिसणार नाही, असं आता वाटतंय.

 हरभजन सातत्याने नवीन काहीतरी करत असतो. त्यामुळे त्यानी आता नव्या इनिंगला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इनिंग आहे टॉलीवूडमध्ये. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज टीममधून खेळणाऱ्या हरभजनची तमिळ प्रेक्षकांत खूप लोकप्रियता आहे.

त्याचाच फायदा घेण्यासाठी त्याने तमिळ चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला असावा. त्याच्या ‘फ्रेंडशीप’ या पहिल्यावहिल्या तमिळ चित्रपटाचं मोशन पिक्चर त्यानी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केलं आहे. फ्रेंडशीप हा चित्रपट कॉलेज कँपसवरील थ्रिलरपट असेल असं वाटतंय.

या ट्विटमधल्या पोस्टरही तमिळच आहेत. त्यात तो म्हणतो, ‘वादळी वारे आणि चकाकणाऱ्या विजांच्या उपस्थितीत आम्ही सुपरस्टार थला, थलपति आणि उलागनायगन… च्या राज्यात प्रवेश करतो आहोत.’

या पोस्टरमध्ये हरभजनसोबत अभिनेता अर्जुन सर्जा दिसतो आहे. तसंच तमिळ बिगबॉस फेम अभिनेत्री लॉसलिया मरियनेशन दिसते आहे. मोशन पोस्टरमध्ये पहिल्यांदा कॉलेजमधल्या फळ्यावर लिहिलेल्या केमिकल रिअक्शन्स, केमिस्ट्रितील आकृत्या दिसतात. त्यानंतर लॉसलियाचं दर्शन घडतं, नंतर अवतरतो अर्जुन सर्जा आणि सर्वांत शेवटी सिझनचा बॉल हातात घेऊन हरभजनसिंग दिसतो.

हा चित्रपच खूपच उत्सुकता निर्माण करतो. नक्की या चित्रपटाची कथा काय आहे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या यांनी फ्रेंडशीप सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  डी. एम. उदयकुमार यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2020 मध्ये प्रदर्शित होईल असं मोशन पोस्टरमध्ये नमूद केलंय. पण कोविड-19 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळी चित्रपटगृहं बंद आहेत. त्यामुळे हरभजनसिंगचा पहिला तमिळ चित्रपट फ्रेंडशीप कधी रिलीज होतो आणि त्याची ही खेळी कशी होते याकडे सर्वांचच लक्ष असेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *