गौरव चोपडाने आईच्या निधनानंतर दहा दिवसांत वडिलांनाही गमावले / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव चौपडा याचे वडील स्वतंत्र चोपडा यांचे नुकतेच निधन झाले. दहा दिवसांपूर्वीच गौरवच्या आईचेही निधन झाल्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरर त्याने ही माहिती शेअर केली. बिग बॉस 10 मध्ये स्पर्धेक म्हणून गौरव सहभागी झाला होता तसेच त्याने हॉलिवूडचा ऑस्करचे नामांकन मिळालेला चित्रपट ब्लड डायमंडमध्येही काम केले आहे. आपले वडील आपल्यासाठी आदर्श होते, असे त्याने म्हटले आहे.

‘कोरोना’च्या महामारीचा फटका बॉलिवूडलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक चित्रपटांचे, मालिकांचे शुटिंग अनेक महिने बंद होते आता पुन्हा शुटिंग सुरू होऊ लागली आहेत. अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून अनेक कलाकार बरे होऊन घरी परतले तर कोणी अद्याप ‘कोरोना’शी लढत आहेत. गौरव शर्माने नुकतेच एका वृतपत्राशी बोलताना सांगितले होते की, त्याच्या आई-वड़िलांना ‘कोरोना’ची लागण झाली असून दोन वेगवेळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातही त्याची आई खूप आजारी होती. त्याच्या आईला पॅनिक्रियाटिक कॅन्सर झाला होता. या आजाराशी त्या गेल्या तीन लर्षांपासून लढत होत्या.

केवळ दहा दिवसांच्या अंतराने त्याच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, आपले वडील आपले आदर्श होते, असे सांगताना आपल्या आई आणि वडिलांना श्रद्धांजली वाहणाऱ्या भावूक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. याबरोबर आई आणि वडिलांचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. आपली आई आपली ताकद, आपला स्रोत आणि सर्वांत कणखर होती. तर, वडील आपल्यासाठी प्रेरणा, आदर्श आणि आपले हिरो होते. ते खूपच खास होते, असे त्याने लिहिले आहे. त्यांचा मुलगा असल्याबद्दल आपण स्वतःला धन्य समजतो. दहा दिवसांत ते दोघे आपल्याला सोडून गेले त्यामुळे आता एक पोकळी आहे, जी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. चाहत्यांनीही त्याच्या पालकांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.