प्रतिकात्मक छायाचित्र (फोटो - विकीपीडियावरून साभार)

सुंदर आणि चमकदार चेहरा मिळवण्यासाठी तरूणी अनेक उपाय करत असतात. यासाठी महागडे उपचार घेणे किंवा वेगवगेळे क्रिम वापरणे असे उपाय करताना अनेकजणी दिसून येतात. मात्र, आपल्या घरातील किचनमध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींद्वारे आपल्याला अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. आपल्या घरात असणाऱ्या बेकिंग सोड्याचा वापर आपण आतापर्यंत केवळ स्वयंपाकासाठी होताना पाहिले आहे. मात्र, याद्वारे आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचाही मिळवता येते. कसे ते पाहूया,

१. बेकिंग सोडा आणि गुलाब पाणी

स्किन व्हाइटनिंग आणि अनइवन स्किन टोनसाठी हा खूपच सोपा उपाय आहे. यासाठी बेकिंग सोड्याला गुलाब पाण्यात मिसळून पेस्ट करावे. त्यानंतर या पेस्टला त्वचेवर लावून ५-१० मिनटे मसाज करावे आणि त्यानंतर वाळण्यासाठी सोडून द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवुन घ्यावे. आठवड्यात दोन-तीन वेळा हे पेस्ट लावावे.

२. बेकिंग सोडा आणि अॅप्पल साईडर व्हिनेगर

दोन चमचा बेकिंग सोडा आणि तीन चमचा अॅप्पल साईडर व्हिनेगर घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर या पेस्टला चेहऱ्यावरील काळ्या भागावर लावून चांगले मसाज करावे. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवुन घ्यावे. स्किन व्हाइटनिंगसाठीसुद्धा बेकिंग सोडा आणि अॅप्पल साईडर व्हिनेगर हे पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावावे.

३. बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि नारळ पाणी

लिंबाचा रस त्वचेसाठी खूपच चांगला असतो. यामध्ये असणारा विटामिन सी बेकिंग सोड्यासोबत मिसळून स्किन व्हाइटनिंगसाठी एजेंटसारखे काम करतो. कोरड्या त्वचेसाठी हा फारच फायदेशीर ठरतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात, एक चतुर्थांश नारळपाणी आणि तीन चार थेंब लिंबाचा रस घालून चांगले पेस्ट करून घ्यावे. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर त्यामध्ये काही थेंब टी ट्री ऑईलसुद्धा घालू शकता. त्यानंतर या पेस्टने स्किनवर चांगल्या प्रकारे मसाज करावे. ५ ते १० मिनिटानंतर ते धुवुन घ्यावे. हे स्किन व्हाइटेनिंगसोबत पिगमेंटेशन आणि स्किन पोर्ससाठीही खूप चांगले असते.

४. बेकिंग सोडा, कॉर्नफ्लोअर आणि हळद

एक चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि हळद मिसळून पेस्ट करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये चार चमचे गुलाब पाणी आणि लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. या फेस फॅकला चेहऱ्यावर लावून वीस ते तीस मिनिटासाठी वाळण्यासाठी सोडून द्यावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवुन घ्यावे. हे पेस्ट स्किन व्हाइटेनिंगसोबत अॅक्ने, स्कार्स आणि स्किन डलनेससाठीसुद्धा उपयोगी आहे.

५. बेकिंग सोडा आणि टोमॅटो ज्यूस

टोमॅटोचे अनेक प्रकार अँटी ऑक्सिडेंट्स आणि नॅचरल ब्लिचिंग एजेंट असतात, जे चेहऱ्याला चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात टोमॅटोचे ज्यूस मिसळून ते पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यावे. पेस्ट वाळल्यानंतर ते धुवुन घ्यावे. हे स्कीन व्हाइटेनिंगसोबत डेड सेल्सलासुद्धा रिमूव्ह करण्यास मदत करतात.

(टीप – बेकिंग सोडा त्वचेसाठी तसा नुकसानदायक नसतो. मात्र, यामुळे काही लोकांना खाजवणे किंवा आगआग होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चेहऱ्यासाठी याचा वापर करण्यापूर्वी पहिल्यांदा हाताच्या एका भागावर ते लावून पाहा. यामुळे काही त्रास होत नसल्यास तरच चेहऱ्याला लावा अन्यथा लावू नका. तसेच हे लावण्यापूर्वी त्वचा तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)